देवरूखला रविवारी गणेशांचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूखला रविवारी गणेशांचे आगमन
देवरूखला रविवारी गणेशांचे आगमन

देवरूखला रविवारी गणेशांचे आगमन

sakal_logo
By

देवरूखला रविवारी
गणेशांचे आगमन
साडवली ः संगमेश्वर तालुक्यात गणेशोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होणार असून, मानाचे पहिले दोन गणपतींचे वाजतगाजत आगमन होणार आहे. देवरूख वरची आळी येथील ३५० हून अधिक वर्षाची परंपरा असलेला चौसोपीवाड्यातील गणपती व माणिक चौक येथील श्रीकांत जोशी यांच्या निवासस्थानी स्थापन होणारा गणपती असे दोन गणपती रविवारी सकाळी आणले जाणार आहेत. शिवाजी चौक येथील नरेंद्र भोंदे यांच्या चित्रशाळेतून अश्वावर आरुढ श्रींची मूर्ती, सोबतीला रिद्घी-सिद्घी, भालदार, चोपदार असे या दोन्ही गणपतींचे स्वरूप असते. प्रथम ग्रामदेवता सोळजाईला निमंत्रण दिले जाते व नंतर या गणपतींची वाजतगाजत मिरवणूक निघते. विधीवत प्राणप्रतिष्ठापना होऊन पाच दिवस हा उत्सव साजरा होतो. मोरगावच्या सिद्घिविनायकाप्रमाणेच चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव साजरा होतो. दशक्रोशीतील भाविक या उत्सवात सहभागी होत असतात.
-------------------
हेदली ग्रामस्थांचा
शिवसेनेत प्रवेश
खेडः तालुक्यातील हेदली येथील ६० हून अधिक कुटुंबीयांनी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गावच्या सर्वांगीण विकासांसाठी प्रवेश करत असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. यामध्ये राजू घाणेकर, मनोज शिंदे, जयराम शिंदे, भगवान शिंदे, अनंत शिंदे, अशोक शिंदे, विजय माने, मोहन बैकर, चंद्रकांत घाणेकर, मनोहर झुझम, बबन साळवी, बबन शिंदे, प्रमोद बडबे, एकनाथ चिनकटे, वैभव घाणेकर, रोहित घाणेकर, पांडुरंग माने यांच्यासह अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे. या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती चंद्रकांत कदम, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, रामचंद्र आईनकर, मधुकर शिरगांवकर, शांताराम म्हसकर, युवराज गुजर, सुप्रिया पवार, निकेतन पाटणे, राजेश बुटाला, संजय मोदी, विजय कदम, शैलेश कदम उपस्थित होते.
---
तुळशी - देवाचा
डोंगर रस्त्याची दुरवस्था
खेडः तालुक्यातील तुळशी -देवाचा डोंगर रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी सेवा बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा मार्ग सुस्थितीत आणण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तुळशी-देवाचा डोंगर हा अतिशय दुर्गम भागात असून, या ठिकाणी दळणवळणाचे कोणतेही साधन नाही. सद्यःस्थितीत एसटी महामंडळाची बस तुळशी-चव्हाणवाडीपर्यंत जाते; मात्र त्यापुढे जात नाही. या रस्त्यासाठी मोर्चे, आंदोलने केल्यानंतर तुळशी -चव्हाणवाडी ते तुळशी-देवाचा डोंगर रस्ता तयार झाला; मात्र सद्यःस्थितीत या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वर्षे या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्षच दिलेले नाही. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90577 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..