मेमू स्पेशल गाडी कायम सुरू ठेवावी ः शौकत मुकादम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेमू स्पेशल गाडी कायम सुरू ठेवावी ः शौकत मुकादम
मेमू स्पेशल गाडी कायम सुरू ठेवावी ः शौकत मुकादम

मेमू स्पेशल गाडी कायम सुरू ठेवावी ः शौकत मुकादम

sakal_logo
By

मेमू स्पेशल गाडी कायम
सुरू ठेवावीः शौकत मुकादम
चिपळूण, ता. २६ः कोकण रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा-चिपळूणदरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून, आठ डब्याची ही गाडी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ही गाडी बंद न करता ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
कोकण रेल्वेने कोकणातील लाडक्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने गणेशोत्सवासाठी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत मेमू स्पेशल गाडी सुरू केली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा-चिपळूण अशा विस्तारित करण्यात आल्या आहेत; मात्र आम्ही दादर ते चिपळूण या गाडीची गेले अनेक वर्षे मागणी केली आहे. ती गाडी अद्याप सुरू केलेली नाही. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले होते. चिपळूण व परिसरातील जनतेसाठी मुंबईत खरेदीसाठी जाण्यासाठी ही गाडी आवश्यक आहे. ती चालू झाली नसली तरी आता केवळ गणेशोत्सवासाठी सुरू केलेली दिवा ते रोहा ही मेमू गाडी कायमस्वरूपी विस्तारित करून दिवा-चिपळूण अशी चालवावी व या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करून ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणीही अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90579 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..