कार्यतत्पर व विद्यार्थीप्रिय शिक्षिका छाया कारंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यतत्पर व विद्यार्थीप्रिय शिक्षिका छाया कारंडे
कार्यतत्पर व विद्यार्थीप्रिय शिक्षिका छाया कारंडे

कार्यतत्पर व विद्यार्थीप्रिय शिक्षिका छाया कारंडे

sakal_logo
By

rat२६p९.jpg
४५७१०
छाया कारंडे


कार्यतत्पर, विद्यार्थीप्रिय शिक्षिका छाया कारंडे
सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सौ. छाया रघुनाथ कारंडे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. मूळगाव खळे (ता. पाटण) असणाऱ्या सौ. कारंडे मॅडमचे माहेर मानेवाडी (ता. पाटण). त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. पाच भावंडांच्या कुटुंबात वाढलेल्या मॅडमचे शिक्षणही मुंबई येथे झाले. मे १९८१ मध्ये त्या कारंडे कुटुबांच्या सुनबाई झाल्या व पतीसोबत कोकणवासीय झाल्या. प्रिया, प्रेमा, स्वप्नील या तीन मुलांच्या जन्मानंतर सावर्डे येथे त्यांनी १९९०ला डीएड् केले. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सावर्डे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून सेवेत रूजू झाल्या. लहानपणापासूनच समाजाचे शिल्पकार असणारे शिक्षक आपल्याला व्हायचे आहे, हे त्यांचे स्वप्न होते. पती रघुनाथ कारंडे यांच्यामुळे ते पूर्ण झाले. यशस्वी स्त्रीला खंबीर साथ पुरुषाची लाभल्यास जीवन यशस्वी होते, याचा पडताळा आला. मॅडमची मोठी मुलगी प्रिया आयटी इंजिनियर बीएसएनएलमध्ये JTO आहे. दुसरी मुलगी प्रेमा एम. एस्सी. एम. एड्. आहे. मुलगा स्वप्नील डॉक्टर असून समाजाच्या सेवेचे व्रत त्याने घेतले आहे तर सुनबाई सुप्रिया एमईएसबीमध्ये कार्यरत आहेत. दोन्ही जावई उच्च पदावर काम करतात. मुली, जावई, मुलगा, सुनबाई, नातवंडे असा परिवार असणाऱ्या कारंडे मॅडम कुटुंबाचा आधारवड आहेत. सण, समारंभ साजरे करून रूढी, परंपरा, आपले संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचवतात. बहीण-भावांमधील नातेसंबंध तेवढ्याच संवेदनशीलपणे सांभाळतात. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सावर्डे व खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात त्यांनी एकूण ३२ वर्षे सेवा बजावली. आपले कौशल्य वापरून त्यांनी गणित, हिंदी विषयाचे अध्यापन केले. विद्यार्थी गुणसंपन्न होण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयाचे गेली ३२ वर्षे मार्गदर्शन केले. विद्यालयाचा कोणताही कार्यक्रम असो, धडाडीने त्यात सहभागी होणे हा नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये आढळतो. आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडवणे व कठीण गणित विषय सोपा करून शिकवणे. विद्यार्थ्यांचे गणितीय संबोध स्पष्ट करणे, हा त्यांचा हातखंडा . त्यामुळे त्या विद्यार्थीप्रिय झाल्या. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणे, वेळ पडल्यास कठोर होणे, वरिष्ठांनी दिलेल्या कोणत्याही कामात आपण कोठे कमी पडणार नाही ते काम वेळेत पूर्ण करणे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्यातूनच त्यांची कार्यतत्परता दिसून येते.
- सौ. सुलोचना शंकरराव जगताप
खेर्डी-चिंचघरी (सती).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90619 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..