घरगुती गणेश सजावट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गणेश
सजावट स्पर्धा
घरगुती गणेश सजावट स्पर्धा

घरगुती गणेश सजावट स्पर्धा

sakal_logo
By

घरगुती गणेश
सजावट स्पर्धा
देवगड ः इंद्रधनू-देवगड या संस्थेच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्र मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. संस्थाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य राजीव पडवळ, भावेश पटेल, आनंद रामाणे, वैभव केळकर, मिलिंद मोर्ये, यतीन कुळकर्णी, दिनेश पटेल,शंकर मुणगेकर, साईनाथ सुके उपस्थित होते. प्रथम विजेत्यास ५ हजार हजार, द्वितीय रोख ३ हजार, तृतीय क्रमाकांला रोख २ हजार तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर न करता नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून पारंपरिक पद्धतीने सजावट आवश्यक आहे. सचिव प्रशांत वाडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुळकर्णी यांनी केले आहे.
-------------------
नेमळे येथे
गणवेश वितरण
नेमळे ः नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत गरजू २० विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आल. यावेळी प्राचार्या कल्पना बोवलेकर, राम राठोड, राजेश गुडेकर, अनिल कांबळे, यु. यु. राऊळ, एम. पी. सारंग, नितीन धामापूरकर, नेत्रा चव्हाण, बंगाळ सिटी, एस. एम. सुतार, आर. एस. राऊळ, ए. बी. कोरगावकर, डी. आर. सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. डॉ. हेमंतकुमार सावंत, जयवंत वेंगुर्लेकर यांनी प्रत्येकी हजार रुपये दिले. तसेच शिक्षक व कर्मचारी यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
--------------------
नेमळेत २ रोजी
सत्कार समारंभ
सावंतवाडी ः नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ आयोजित माजी विद्यार्थी मेळावा आणि दहावी-बारावी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ २ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाला प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महादेव राऊळ यांनी केले आहे.
--
शिक्षणाबाबत
नरडवेत धडे
कणकवली ः नरडवे इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘शिक्षणातील बदलते प्रवाह’ या विषयावर अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबईचे सरचिटणीस विजय सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुरेश परब, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष अनंत सावंत, सचिव अंकुश सावंत, लक्ष्मण सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90620 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..