गणेशोत्सव नियोजनास सर्वपक्षीयांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव नियोजनास सर्वपक्षीयांची पाठ
गणेशोत्सव नियोजनास सर्वपक्षीयांची पाठ

गणेशोत्सव नियोजनास सर्वपक्षीयांची पाठ

sakal_logo
By

45771
मालवण ः येथील पालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली नियोजन बैठक.

मालवण बैठकीस सर्वपक्षीयांची पाठ

गणेशोत्सवाबाबत नियोजन; व्यापारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : गणेशोत्सव काळात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नियोजनाबाबत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पालिकेत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. काही व्यापारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली बैठक नियोजन सांगून अर्ध्या तासात आटोपती घेण्यात आली.
गणेशोत्सव काळात भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी चतुर्थीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर पालिकेत नियोजन बैठक घेण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात ही बैठक झाली.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, बांधकाम पर्यवेक्षक सुधाकर पाटकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, वाहतूक पोलीस जी. के. परब, उमेश शिरोडकर, आगार व्यवस्थापक सचेतन बावलेकर, रिक्षा संघटनेचे सुधीर कद्रेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील, हरेश देऊलकर, महेंद्र पारकर, रवींद्र तळाशिलकर आदी उपस्थित होते.
शहरातील बहुतेक रस्ते पावसाळ्यापूर्वी केलेले आहेत. काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. हायमास्ट दुरुस्तीचे कामही सुरू आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. विसर्जनस्थळी लाईट व्यवस्था आहे. एकूण २२ विसर्जनस्थळे असून त्याठिकाणी लाईट पुरविण्याचे काम दिले आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

अशी असेल पार्किंग व्यवस्था
सागरी महामार्ग येथे अवजड वाहनांचे पार्किंग, नाट्यगृह येथे खासगी वाहन पार्किंग, टोपीवाला हायस्कूल येथे चारचाकी खासगी गाड्या, टेम्पो, बांगीवाडा येथे सहा आसनी रिक्षा, टेम्पो, सारस्वत बँकेसमोरील रस्त्यावर एका बाजूला दुचाकी पार्किंग, मशीद गल्ली येथे दुचाकी, सायकल पार्किंग, जेटी परिसरात अतिरिक्त रिक्षा पार्किंग, सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता येथे रिक्षा आणि हातगाडी पार्किंग, राणे मेडिकल येथे सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त सायकल मशीद गल्ली पर्यंत जाऊ शकतात. हॉटेल सागर किनारा येथे रिक्षा थांबा, नेरूरकर गल्ली येथे सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. स्टेट बँक - भरड नाका - बाजारपेठ रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगसाठी मनाई आहे.
--
कोट
नियोजन बैठकीचे सर्वांनाच निमंत्रण दिले होते; मात्र, दोन दिवसांपूर्वीच तहसीलदारांनी बैठक घेतली होती. त्यामुळे कदाचित या बैठकीला कोण आले नसतील.
- संतोष जिरगे, मुख्याधिकारी
------------
चौकट
याठिकाणी असणार बंदोबस्त
चतुर्थी काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे महत्वाच्या चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीला होमगार्ड असणार आहेत. सागरी महामार्ग, एसटी स्टॅण्ड, भरड, तारकर्ली नाका, सकपाळ नाका, जेटी नाका, फोवकांडा पिंपळ, जेट्टी नाका, राणे मेडिकल, कोळंब सागरी महामार्ग याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
--------------
चौकट
फलक लावण्यास मनाई
शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवर खड्डे खोदून फलक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90622 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..