एमआयडीसी असोसिएशन कामगारांसाठी कटीबद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसी असोसिएशन कामगारांसाठी कटीबद्द
एमआयडीसी असोसिएशन कामगारांसाठी कटीबद्द

एमआयडीसी असोसिएशन कामगारांसाठी कटीबद्द

sakal_logo
By

45776
कुडाळ ः शिबिरात बोलताना मोहन होडावडेकर. सोबत नीता गोवेकर, अमित वळंजू, सचिन मदने आदी.


एमआयडीसी असोसिएशन कामगारांसाठी कटीबद्द

मोहन होडावडेकर ः कुडाळात आरोग्य शिबिराला प्रतिसाद

कुडाळ, ता. २६ ः कामगारांच्या कल्याणासाठी भविष्यात एमआयडीसी उद्योजक असोसिएशनतर्फे येत्या काळात नवनवीन संकल्पना प्रभाविपणे राबविण्यात येणार आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी एमआयडीसी असोसिएशन कटीबद्द आहे, असे प्रतिपादन येथील एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी येथील कामगारांसाठी आयोजित आरोग्य शिबीरात केले. या शिबीराचा लाभ एमआयडीसीतील सुमारे पाचशेहून अधिक कामगारांनी घेतला.
राज्य व केंद्र सरकारच्याही कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी विविध योजना आहेत. मात्र, या योजनांचा म्हणावा तसा लाभ कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना होताना दिसत नाही. यासाठी एमआयडीसी असोसिएशनने कालबद्ध कार्यक्रम हाती घेतलेला असून त्याचाच एक भाग म्हणून कामगारांमध्ये त्यांच्या शारीरीक आरोग्याबाबत सतर्कता निर्माण व्हावी, यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी करुन त्या अनुषंगाने आवश्यक ती वैद्यकीय सेवा देण्यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथील एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, कामगार कल्याण केंद्र कुडाळ, रोटरी क्लब कुडाळ व कोकण कला शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एमआयडीसी कामगारांसाठी असोसिएशनच्या संकुलात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. याचे उद्घाटन रोटरी कल्बच्या डेप्युटी गर्व्हनर निता गोवेकर यांच्या हस्ते व असोसिएशनचे अध्यक्ष होडावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजु, असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, ग्लोबल फाऊंडेशनचे लक्ष्मण देसाई, आयसीटीसीचे समुपदेशक मानसींग पाटील, रोटरी क्लब कुडाळचे सेक्रेटरी दिनेश आजगावकर, कुडाळ रोटरीचे माजी अध्यक्ष अभिषेक माने, सचिन मदने, अॅड. राजीव बिले, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद बांदीवडेकर, शशिकांत चव्हाण, माजी कार्यवाह द्वारकानाथ धुरी, सहकार्यवाह कुणाल वरकसकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, पदाधिकारी कमलाकांत परब, उमेश गाळवणकर, मुश्ताक शेख आदी उपस्थित होते. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. पार्सेकर यांनी समारोप केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90626 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..