भैरी चंडिका बैलजोडीची नांगरणीत बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरी चंडिका बैलजोडीची नांगरणीत बाजी
भैरी चंडिका बैलजोडीची नांगरणीत बाजी

भैरी चंडिका बैलजोडीची नांगरणीत बाजी

sakal_logo
By

rat२६p१.jpg
४५६९२
लांजाः भात नांगरणी स्पर्धेतील एक क्षण.

भैरी चंडिका बैलजोडीची नांगरणीत बाजी
लांजाः तालुक्यातील खेरवसे येथे भातनांगरणी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत गावठी बैलजोडीमध्ये भैरी चंडिका बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. खेरवसे येथील श्री स्वयंभू शंकर देवालयाच्यावतीने राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे खेरवसे येथील कुंभ्याचा मळा या ठिकाणी आयोजन केले होते. राज्यस्तरीय गावठी गटात प्रथम श्री भैरी चंडिका, द्वितीय भैरी चंडिका, तृतीय शुभम सुर्वे, चतुर्थ आशय गुरव व स्वयंभू कृपा पाटगावने पाचवा क्रमांक पटकावला. खिलार गटात प्रथम रमेश पावसकर, द्वितीय आकाश देवरूखकर, तृतीय द्वारकानाथ माने, दिलीप गुरव यांनी चौथा तर भारत कांबळे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत घाटी बैलजोडीमध्ये प्रथम क्रमांकाला रोख रक्कम ७ हजार रु. व ढाल, द्वितीय ५ हजार रु. व ढाल, तृतीय ३ हजार रु. व ढाल तसेच गावठी बैलजोडीमध्ये प्रथम क्र. ५ हजार रु. व ढाल, द्वितीय ३ हजार रु. व ढाल, तृतीय १ हजार रु. व ढाल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये घाटी बैलजोडीसाठी प्रवेश फी ५०० रु. तर गावठी बैलजोडीसाठी ३०० रु. अशी असणार आहे.
------
चाकरमान्यांसाठी लांजातून बस हवी
लांजा ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गावी येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी लांजा बसस्थानकात सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात अभिजित राजेशिर्के यांनी म्हटले आहे की, ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. तत्पूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर मुंबईकर चाकरमानी हे गावी दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत लांजा बसस्थानकात असलेल्या असुविधांमुळे प्रवाशी व चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच बसस्थानकात कायमस्वरूपी निवाराशेड बांधणे व त्याची दुरुस्ती करण्यात यावी. लोकांची होणारी गर्दी आणि वर्दळ पाहता तात्पुरती निवारा शेड बांधणे, अ व ब संवर्गातील स्वच्छतागृहे प्रसाधनगृहात दिव्यांची व्यवस्था करणे, त्याचप्रमाणे बसस्थानकातील पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
--------------
rat२६p२.jpg ः
45703
चिपळूण ः अजित कदम यांचे अभिनंदन करताना मित्रपरिवार.

अजित कदम यांचे मॅरेथॉनमध्ये यश
चिपळूण ः सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक प्राचार्य, टेरवचे सुपुत्र अजित कदम यांनी वाढदिवसानिमित्त ५२ किमीची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या ६ तासात यशस्वीरित्या पूर्ण केली. सातत्य, अथक प्रयत्न, जिद्द, चिकाटी, उच्च मनोधैर्य यामुळेच वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल सरस्वती परिवार तसेच विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
----------------
वक्तृत्व स्पर्धेत
सृष्टी शिंदे प्रथम
चिपळण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सृष्टी शिंदे हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. पुणे येथील ''मी सावरकर'' या स्पर्धेत तिसरीमध्ये तिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर ''मी सावरकर ''या स्पर्धेत चौथ्या वर्षीदेखील उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. जेएसडब्ल्यूतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात २०२०-२१ मध्ये तीन प्रथम क्रमांक पटकावले. याच स्पर्धेत २०२१-२२ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. मुंबईमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षातर्फे रामशेठ ठाकूर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केला. मृणाल हेगशेट्ये स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम फेरीनंतर विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त वक्तृत्वफेरी घेण्यात आली. त्यासाठी तिला ''पात्र''हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत सुमारे २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
------------
शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी
दाभोळ ः रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड परिसरातील शिवसेना शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी मुंबई येथे जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत जिल्हाप्रमुखपदी शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुखपदी सुधीर कालेकर, दापोली विधानसभा संघटकपदी प्रदीप सुर्वे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी आदेश केणे, मंडणगड तालुकाप्रमुखपदी प्रताप घोसाळकर, दापोली तालुकाप्रमुखपदी उन्मेष राजे, खेड तालुकाप्रमुखपदी विजय जाधव, दापोली शहराध्यक्षपदी प्रसाद रेळेकर यांच्यासह सर्व प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार रवींद्र फाटक, आमदार योगेश कदम, दापोली-खेड-मंडणगडमधील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90646 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..