राजापूर बाजारपेठेला प्रतीक्षा चाकरमान्यांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर बाजारपेठेला प्रतीक्षा चाकरमान्यांची
राजापूर बाजारपेठेला प्रतीक्षा चाकरमान्यांची

राजापूर बाजारपेठेला प्रतीक्षा चाकरमान्यांची

sakal_logo
By

rat26p15.jpg
45698
राजापूरः गणेशोत्सव साहित्याने सजलेले दुकान.

rat26p16.jpg
45699
विक्रीसाठी ठेवण्यात आलेली कापडी मखरे.


राजापूर बाजारपेठेला प्रतीक्षा चाकरमान्यांची
थर्माकोलची मखरे हद्दपार ;सद्यःस्थिती गर्दी कमीच
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी येथील बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सवानिमित्ताने खरेदीसाठी सद्यःस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये फारशी लोकांची गर्दी दिसत नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये चाकरमानी दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर बाजारपेठेतील रेलचेल आणि गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविधांगी वस्तू विक्रीसाठी दुकानदारांनी ठेवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये श्री गणेशाला लागणार्‍या विविध प्रकारच्या कंठमणी, हारांसह सजावटीसाठी लागणारी रंगीत पताका, कागद यांसह विविधांगी डिझाईनच्या कापडी मखरांचाही समावेश आहे. खरेदी-विक्रीतून होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीला गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे ब्रेक लागला होता; मात्र, यावर्षी कोरोना महामारीला ब्रेक लागल्याने गणेशोत्सवानिमित्ताने विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून नेहमीप्रमाणे लाखो रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या थर्माकोलच्या वापरावर शासनाने बंदी घातल्याने गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढात होत असलेली थर्माकोलची मखरे बाजारपठेतून हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी विक्रीसाठी कापडी मखरे दाखल झाली असून त्याने बाजारपेठ सजली आहे. चारशे रुपयांपासून ते थेट तीन-साडेतीन हजार रुपये किंमतीची कापडी मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये दोन बाय दोन फुटापासून ते थेट सहा बाय सहा फुटाच्या कापडी मखरांचा समावेश आहे.
--------------------
चौकट
कापडी मखरांना मागणी वाढली
गणेशभक्तांकडून विविध रंगासह आकाराच्या कापडी मखरांना मागणी वाढली आहे. त्यातून, गणेशोत्सवाच्या काळामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90648 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..