मंडणगड - डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना लवकरात लवकर न्याय मिळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना लवकरात लवकर न्याय मिळावा
मंडणगड - डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना लवकरात लवकर न्याय मिळावा

मंडणगड - डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना लवकरात लवकर न्याय मिळावा

sakal_logo
By

Rat२६p१७.jpg
४५७००
मंडणगडः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर घ्यावा यासाठी ठोस निर्णय घेऊन या हत्येच्या प्रशासनाला निवेदन सादर करताना अंनिसचे पदाधिकारी.

डॉ. दाभोलकर यांना न्याय मिळावा
अंनिसची मागणी ;तपासाची गती वाढवण्याची मागणी
मंडणगड, ता. २६ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला ९ वर्षे पूर्ण होत असून, अद्यापही त्यांचे मारेकरी असलेल्या मुख्य सूत्रधारांना पकडता आले नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी शासनाने तपासाची गती वाढवावी, अशी मागणी मंडणगड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे पत्र मंडणगड तहसीलदार कार्यालय तसेच पोलिस स्टेशन यांना समितीच्यावतीने मंडणगड तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष विजय पोटफोडे, मंडणगड कार्याध्यक्ष सहा. प्रा. अरुण ढंग, प्रशिक्षण कार्यवाह राजेश मर्चंडे उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. समाजसुधारकांना जाणीवपूर्वक संपवण्यात येत आहे. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अपेक्षित गतीने न झाल्याने पुढील हत्यांची मालिका झाली. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून अनिष्ट आणि अघोरी प्रथा-परंपरापासून सुटका करणाऱ्या व्यक्तींची हत्या होणे, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. या समाजसुधारकांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90650 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..