संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

तंटामुक्ती अध्यक्षपदी दत्ताराम अडबल
साखरपा ः नजीकच्या किरबेट भोवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दत्ताराम अडबल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. अडबल माजी सरपंच आहेत. त्यामुळे त्यांना गावातील सामाजिक आणि भौगोलिक माहिती आहे. समंजस तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांचे नाव या पदासाठी सुचवण्यात आले. या वेळी सरपंच रेवती निंबाळकर, प्रशांत अडबल, सचिन अंकुशराव, उदय पत्की, अभिजित शेळके, तलाठी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------
rat26p25.jpg
45734
साखरपाः विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सरपंच बापू शिंदे.

भडकंबा ग्रामपंचायतीत गौरव सोहळा
साखरपाः नजीकच्या भडकंबा येथे ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत्सवी दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दहावी, बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यात हर्षराज शिंदे, चैतन्य धावडे, सोहम जामसंडेकर, कुणाल कनावजे यांच्यासह ७५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथे पार पाडलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या निधी लोध हिचाही सत्कार करण्यात आला. एकांकिका, वेबसिरिज यामधून अभिनय करत गावाचे नाव उंचावणारे ग्रामस्थ अतुल शिर्के आणि गावातील पहिल्या महिला वकील तेजल लाड सुर्वे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच बापू शिंदे, प्रांजल शिंदे, पोलिसपाटील विशाखा शिर्के, सीताराम दुधाणे, शेखऱ आक्टे, बाळू जामसंडेकर, अंतरा भोसले उपस्थित होते.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90671 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..