राजापूर ः चौदा गावांमधील पाणीपुरवठा योजना अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  चौदा गावांमधील पाणीपुरवठा  योजना अडचणीत
राजापूर ः चौदा गावांमधील पाणीपुरवठा योजना अडचणीत

राजापूर ः चौदा गावांमधील पाणीपुरवठा योजना अडचणीत

sakal_logo
By

....
पांगरेबुद्रुक धरणाची गळती रोखा

आमदार साळवींचा तारांकित प्रश्‍न; १४ गावांतील पाणीपुरवठा योजनेवर सावट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः चौदा गावांमधील लोकांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना प्रस्तावित असलेल्या तालुक्यातील पांगरेबुद्रुक येथील धरणाला गळती लागली असून, त्याबाबत आमदार राजन साळवी यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्‍नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. पाण्याच्या होत असलेली गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
धरण गळतीच्या तारांकित प्रश्‍नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. त्या वेळी त्यांनी धरणाच्या मुख्य सांडवा द्वारविरहित असून सांडव्याला गळती लागलेली नसून धरणाच्या मुख्य विमोचकाच्या विहिरीतील सेवाद्वाराच्या रबरसिलमधून अल्प प्रमाणात गळती होत असल्याचे सांगितले. धरणाच्या सेवाद्वाराच्या रबरसिलमधून अल्प प्रमाणात होणारी गळती थांबवण्याचे काम यांत्रिकी संघटनेच्या पाखरण कार्यक्रमामध्ये प्रस्तावित असून सन २०२२-२३ च्या प्रापण सूचीमध्ये या कामाचा समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
...
चौकट
मुख्य दरवाजाला गळती
तालुक्यातील पांगरेबुद्रुक येथे शासनातर्फे धरण बांधण्यात आले असून, त्याचे २०१० मध्ये बांधकामही पूर्ण झाले आहे. या धरणाच्या गळतीबाबत आमदार साळवी यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यामध्ये सांडव्यातील मुख्य दरवाजाला गळती लागल्याचे स्पष्ट करत त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
...
चौकट
२५. ६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
पांगरेबुद्रुक येथील धरणातील पाणीसाठ्यावर आधारित नळपाणी योजना राबवण्यात येणार आहे. या नळपाणी योजनेद्वारे परिसरातील चौदा गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सुमारे २५. ६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या प्रादेशिक नळपाणी योजनेला राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ११ मे, २०२२ ला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सध्या या कामाची निविदा स्तरावरील कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90672 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..