मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजपला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजपला बळ
मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजपला बळ

मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजपला बळ

sakal_logo
By

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजपला बळ
आज रत्नागिरीत ; एसटी स्टॅंड, रस्त्यांची कामे मार्गी लागणार
रत्नागिरी, ता. २६ ः राज्यात भाजपा- शिवसेना- शिंदेगटाची सत्ता आल्यानंतर नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपाला त्यांच्या दौऱ्याने बळ मिळणार आहे. मंत्री चव्हाण यांच्या स्वागताचे बॅनर्स सर्वत्र झळकले आहेत. गेले अनेक दिवस भाजपाचा हक्काचा आमदार, मंत्री नसल्यामुळे विकासकामांचे बॅकलॉग भरून काढण्यासाठी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागण्या करण्यात येणार आहेत. रखडलेला एसटी स्टॅंड, शहरातील रस्त्यांची कामे यांसह अनेक मागण्या या वेळी करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सायंकाळी कशेडी घाटापासून दौऱ्याला प्रारंभ केला. उद्या (ता. २७) ते सकाळी ८ वाजता रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करणार आहेत. दुरुस्त केलेले रस्ते, नव्याने केलेले रस्ते चालण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाहीत. त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याबाबत योग्य तो निर्णय मंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहेत. निकृष्ट रस्त्यांबाबत अभियंत्यांच्या निलंबनाची मागणीसुद्धा भाजपाचे नगरसेवक करणार आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेला एसटी स्टॅंड कधी मार्गी लागणार आहे, अशी विचारणा लाखो प्रवासी करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडेही भाजपाच्यावतीने लक्ष वेधले जाणार आहे. स्टॅंडचे कामही मार्गी लागण्यासाठी मंत्री चव्हाण आदेश देतील, अशी शक्यता आहे.
रत्नागिरी शहराच्या दौऱ्यानंतर मंत्री चव्हाण लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करणार आहेत. तिथून ते राजापूरला रवाना होणार असून, तेथेही महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे तसेच आगामी निवडणुकांसाठीही मंत्री चव्हाण यांचे रत्नागिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

चौकट
टोलमाफीसह रुंदीकरणाची मागणी
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएच ०८ पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी महत्त्वाची मागणीसुद्धा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. याशिवाय रत्नागिरीतील कुवारबाव ते साळवी स्टॉप या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्या संदर्भातील निवेदनही मंत्री चव्हाण यांच्याकडे भाजपच्यावतीने दिले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90686 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..