रायफल पिस्टल स्पर्धेत हर्षदा पाटकरला ‘रौप्य’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायफल पिस्टल स्पर्धेत
हर्षदा पाटकरला ‘रौप्य’
रायफल पिस्टल स्पर्धेत हर्षदा पाटकरला ‘रौप्य’

रायफल पिस्टल स्पर्धेत हर्षदा पाटकरला ‘रौप्य’

sakal_logo
By

45809
मुंबई ः महाराष्ट्र रायफल पिस्टल स्पर्धेतील रौप्य पदकाची मानकरी ठरलेल्या हर्षदा पाटकरचे अभिनंदन करताना जॉन नऱ्होना.

रायफल पिस्टल स्पर्धेत
हर्षदा पाटकरला ‘रौप्य’
मालवण : महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी मुंबई यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र रायफल पिस्टल स्पर्धेत येथील दादा पवार यांच्या दि रॉयल पवार शूटिंग सेंटर या रेंजची नेमबाज हर्षदा पाटकर यांनी दैदिप्यमान कामगिरी करताना रौप्य पदक पटकावले. संपूर्ण महाराष्ट्रातून ५६० महिला स्पर्धक यात सहभागी झाले होते या नेमबाजांमधून एअर पिस्टल या गटात खेळताना ४०० पैकी ३७० गुण मिळवून सौ. पाटकर यांनी रौप्य पदक पटकावले. १३ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान दुधाळे शूटिंग रेंज कोल्हापूर येथे ही स्पर्धा झाली. सौ. पाटकर या दादा पवार यांच्या रेंजवर सराव करतात. त्यांना युवराज साळोखे, विक्रम भांगले, दादा पवार, हर्षदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. पाटकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल दि रॉयल पवार शूटिंग रेंजचे अध्यक्ष जॉन नऱ्होना यांनी त्यांचे अभिनंदन केले.
-------------
आचरा भागातून गाय चोरीस
आचरा ः येथून काही दिवसांपासून गुरे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी (ता.२२) आचरा-हिर्लेवाडी येथील प्रविण मुणगेकर यांची रानात चरण्यासाठी बांधलेली दुभती गाय अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर यांनी आचरा पोलिसांकडे केली. आचरा परीसरात गेल्या काही दिवसांपासून रानात चरावयास सोडलेली, गोठ्यात बांधलेली गुरे रात्रीतून अचानक पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी (ता.२३) आचरा हिर्लेवाडी वायंगणी रस्त्यालगतचीही घटना तशीच आहे. दरम्यान, गायीचा सर्वत्र शोध घेऊनही सापडली नसल्याने मुणगेकरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब गंभीर असून पंचायत समिती सदस्या मुणगेकरांनी पोलिसांचे लक्ष वेधले.
-------------
दोडामार्गात ९ रोजी आमसभा
सिंधुदुर्गनगरी ः येथील पंचायत समिती दोडामार्गची आमसभा ९ सप्टेंबरला दुपारी दोनला शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी सभागृह दोडामार्ग येथे होणार आहे, अशी माहिती आमसभा सचिव तथा गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90699 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..