सामंतांनी आपला अजेंडा बंद करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामंतांनी आपला अजेंडा बंद करावा
सामंतांनी आपला अजेंडा बंद करावा

सामंतांनी आपला अजेंडा बंद करावा

sakal_logo
By

45815
मालवण ः शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर. शेजारी महेश कांदळगावकर, मंदार केणी, मंदार ओरसकर आदी. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)


सामंतांनी आपला अजेंडा बंद करावा

हरी खोबरेकर ः निवडणुका आल्या की ‘टाक खडी माग मत’


मालवण, ता. २६ : निवडणुका जवळ आल्यानंतर दत्ता सामंत यांचा ‘टाक खडी माग मत’ हा अजेंडा असतो. परंतु, जिल्ह्यातील जनतेला सामंतांचा अजेंडा माहित झाला आहे. त्यामुळे जनता सामंत यांच्या भूलथापांना कधीही बळी फडणार नाही. सामंतांनी आपला अजेंडा आता बंद करावा. घुमडे येथील धार्मिक कार्यक्रमात सामंतांनी असंगांशी संग करून खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले, त्यामधून त्यांची राक्षसी वृत्ती दिसून आली, अशी टीका शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, सुरेश माडये, बंड्या सरमळकर आदी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, ‘‘दोन दिवसांपूर्वी घुमडे येथील धार्मिक कार्यक्रमात सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात अशाप्रकारे वक्तव्य करणे ही खेदाची बाब आहे. दत्ता सामंत यांनी घेतलेली रस्ते दुरुस्तीची कामे अपूर्ण ठेवून आमदार व खासदार यांची बदनामी करत आहेत. त्यामुळे सामंत यांच्यामध्ये रस्ता दुरुस्तीची कामे करण्याची कुवत नसेल किंवा त्यांच्याकडून कामे पूर्ण होत नसतील तर त्यांनी अशी कामे घेवू नयेत."
ते पुढे म्हणाले, ‘‘देवबाग येथील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु, देवबाग येथे जाऊन फोटोग्राफी करायची व तो रस्ता मीच केला असा भासवायाचा हे सामंत यांचे वर्तन चुकीचे आहे. देवबाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी आम्हीही केली होती. परंतु, त्याबाबत आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही. एसआर फंडातून रस्त्याला ५० लाख रूपये मंजूर झाले होते. चार वेळा निविदा प्रसिद्ध होऊन देखील काही अपप्रवृत्तीच्या माणसांमुळे कोणताही ठेकेदार या कामासाठी इच्छुक नव्हता. परंतु, आमदारांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या कामांना आता सुरूवात झाली आहे. देवबाग रस्त्यासह परिसरातील अन्य रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ३ कोटीचा निधी आणण्यात यश आले.’’
खोबरेकर म्हणाले, ‘‘देवबाग येथील रस्ता चांगल्या पद्धतीने झाला आहे. आवश्यक त्या ठिकाणी क्रॉंक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु दत्ता सामंत यांनी ठेकेदार म्हणून घेतलेली कामे अपूर्ण आहेत. बेळणा रस्ता, पेंडूर रस्ता, मुख्यमंत्री सडक योजना, शहरातील रस्त्यांची ५० लाख रूपयांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे दत्ता सामंत यांनी केवळ फुशारक्या न मारता त्यांनी रस्त्याची कामे अपूर्ण का ठेवली? याचे उत्तर जनतेला द्यावे. येत्या काळात ही कामे पूर्ण न केल्यास तुमच्या व्यक्तव्यानुसार येथील जनताच तुमचा सत्कार करेल अशी टीका त्यांनी केली. शिवसैनिकांनी काही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे दत्ता सामंतांनी लक्षात ठेवावे की यापुढे तुमच्या उत्तराला जशास तसे उत्तर दिले जाईल.’’
आमदारांनी उपलब्ध केलेल्या निधीतून देवबाग, तळाशील येथील बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत; मात्र, देवबाग येथे वाजतगाजत केलेल्या बंधाऱ्याच्या उद्‍घाटनाच्या ठिकाणी एकही दगड पडलेला नाही. आता तुमची सत्ता येऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला तरी ही कामे का सुरू झाली नाही. यावरून शिंदे- भाजप सरकारकडे तुमची काय किंमत आहे हे दिसून येत असल्याची टीकाही श्री. खोबरेकर यांनी केली.
--
१० कोटींच्या निधीचे काय झाले?
एखादे विकासकाम मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना निवेदन द्यायचे असते. मात्र, सामंत यांना राणेंशिवाय कुठे काही दिसतच नाही. त्यामुळेच त्यांनी पडलेल्या खासदाराला निवेदन देत अज्ञान दाखवून दिले आहे. तळाशील बंधाऱ्याच्या कामासाठी १० कोटींचा निधी देणार असे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते त्याचे काय झाले?, असाही प्रश्न खोबरेकरांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90708 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..