कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प
कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प

कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प

sakal_logo
By

rat२६p३९.jpg
४५८१६
लांजाः अपघातग्रस्त कंटेनर.
rat२६p४०.jpg
L४५८१७
अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यात मधोमध असल्याने वाहने तिष्ठत होती.

कंटेनर उलटल्याने वाहतूक ४ तास ठप्प
लांजा, ता. २६ ः मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे यु आकाराच्या अवघड वळणावर कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ४ तास ठप्प झाली होती. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने वेरळ येथे घडली.
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील यु आकाराचे वळण हे वाहनचालकांसाठी आणि विशेषतः कंटेनरसारख्या मोठ्या वाहनांसाठी नेहमीच धोकादायक ठरले आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा महामार्गावरील वेरळ येथील अवघड वळणावर कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या यु आकाराच्या वळणावर खड्डा पडला आहे. शुक्रवारी दुपारी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक (एमएच ४३ बीबी-९२३४) यु आकाराच्या अवघड वळणावर महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे खंडित झाली होती. केवळ दुचाकी व कारसारखी लहान वाहने जात होती.
सदर कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा कंटेनर बाजूला करण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर महामार्गाच्या मधोमध पडलेला हा कंटेनर बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सायंकाळी ४ नंतर सुरळीत करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90710 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..