राजापूर ः वालम यांनी आपण कोणामुळे वाचलो ते आठवावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः वालम यांनी आपण कोणामुळे वाचलो ते आठवावे
राजापूर ः वालम यांनी आपण कोणामुळे वाचलो ते आठवावे

राजापूर ः वालम यांनी आपण कोणामुळे वाचलो ते आठवावे

sakal_logo
By

वालम कोणामुळे वाचले ते आठवावे

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नागरेकर; राणे कुटुंबीयांची ताकद सारे जाणतात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांची राजकीय, सामाजिक ताकद काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशही जाणतो. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पविरोधी जनतेला भडकवण्याचे काम करणाऱ्‍या आणि ज्यांच्याकडे अधिकार नाहीत, त्यांच्याशी काय चर्चा करायची असे बेताल वक्तव्य करणाऱ्‍या स्वयंघोषित पुढारी अशोक वालम यांनी नाणारचा रिफायनरी प्रकल्प कोणामुळे रद्द झाला आणि आपण स्वतः कोणामुळे वाचलो? याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी लगावला आहे.
भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांना बारसू येथे प्रकल्पस्थळाला भेट देण्याच्या काही शेतकऱ्‍यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांनी बारसू येथे गत रविवारी भेट दिली. त्या वेळी प्रकल्पविरोधी महिलांशी संवाद साधताना राणे यांनी तुम्ही ठरवाल ती जागा आणि सांगाल ती वेळ. त्या वेळी मी आपल्याशी चर्चेसाठी येईन, अशी ग्वाही त्या महिलांना दिली. यानंतर अशोक वालम यांनी ज्यांच्याकडे अधिकारी नाहीत, त्यांच्याशी चर्चा कशाला, असा सवाल उपस्थित केला होता. त्याचा खरपूस समाचार नागरेकर यांनी घेतला.
नागरेकर म्हणाले, राणेंना कोणत्याही पदाची गरज नाही. त्यांनी मानसन्मान हा आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळवलेला आहे आणि म्हणून लोक राणेंकडे येतात. कारण, राणेंकडे गेलो की आपले काम निश्चित होणार, असा विश्वास जनतेला वाटतो. यापैकी तुमच्याकडे काय आहे? उगीच बोलायचे म्हणून बोलू नका आणि राणेंवर बोलण्याचा तुम्हाला तर अधिकार आणि तुमची पात्रता नाही. तुम्ही स्वयंघोषित पुढारी म्हणून मिरवता. मग तुमच्याकडे कोणते पद आहे? मुख्यमंत्री व मंत्र्यांना चर्चा करायची तर ते बारसू व स्थानिक जनतेशी करतील, तुम्ही कोण?”
राणे कधीच कुठे जायला, जमावाला सामोरे जायला घाबरत नाहीत.
...
चौकट
पोटात दुखण्याचे कारण काय?
ज्या महिलांनी नीलेश राणेंना थांबवले, त्या महिला आमच्या माता-भगिनी आहेत. त्यांचे ऐकून घेणे आपले कर्तव्यच आहे, असे राणेंनी सांगितले. वेळ द्या तुमच्यासाठी कधीही येतो, असे आश्वासन दिले. महिलांनीही आनंद व्यक्त केला. त्यामुळे तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा सवालही नागरेकर यांनी उपस्थित केला आहे.
..
चौकट
मला इंजेक्शन देऊन मारले असते..
या वेळी नागरेकर म्हणाले, नाणार प्रकल्प विरोधावेळी वालम कोणाच्या छत्रछायेखाली वावरत होते? तुम्ही स्वतः कोणामुळे वाचला आहात? याचाही विसर पडला की काय? जाहीर व्यासपीठावर मी राणेंमुळे वाचलो नाहीतर मला इंजेक्शन देऊन मारले असते, असे तुम्हीच सांगितले होते, हे विसरलात काय? प्रत्येक पोलिस स्थानकांत तुम्हाला राणेंच्या माणसांनी सहकार्य केले, याचा तुम्हाला विसर पडला काय?

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90711 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..