रत्नागिरी ः रत्नागिरीनजीक बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  रत्नागिरीनजीक बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई
रत्नागिरी ः रत्नागिरीनजीक बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

रत्नागिरी ः रत्नागिरीनजीक बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

sakal_logo
By

rat26p30.jpg-
45840
पाली ः येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडलेली दारू व संशयितासह पोलिस.

पाली येथे पकडली
साडेआठ लाखांची दारू

साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क सतर्क

रत्नागिरी, ता. २६ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथे मोठी कारवाई केली. गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतुकीला चाप लावला. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या ८ लाख ४४ हजार ४०० रुपये किमतीच्या दारूसह १३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक महामार्गावरून होते. ही वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून एका चारचाकी गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने पाली येथे वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी एका चारचाकी वाहनात (एमएच ०९, ईएम ८२०७) संशयास्पद बॉक्स आढळून आले. ते उघडून पाहिले असता, त्यांत गोवा बनावटीची दारू आढळून आली. या कारवाईत ८ लाख ४४ हजार ४०० रुपये किमतीचे मद्याचे ११० बॉक्स जप्त केले. वाहन व वाहनचालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वाहनासह १३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कांतिलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त तडवी, रत्नागिरीचे अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण विभागाचे निरीक्षक बापूसाहेब डोणे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जवान अर्शद शेख, दत्तप्रसाद कालेलकर यांनी केली. याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक, एस. ए. भगत करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90718 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..