सजावट साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सजावट साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी
सजावट साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी

सजावट साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

येई गणेशा लोगो
---

सजावट साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी
सावंतवाडी, ता. २६ ः गणशोत्‍सवानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. गणेशमूर्ती, आरास सजावटीपासून पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्‍याने यंदा चांगला व्यवसाय होईल, असा विश्‍वास विक्रेत्‍यांना आहे.
गणरायाच्या स्वागताची तयारी गाव पातळीपासून शहरातही सुरू आहे. नवनवीन सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. फुलमाळा, मोती माळा, चमक माळा, सुवर्ण रौप्य माळा, मोती कंठी, वेलवेट रुमाल, सूर्यफूल, भरतकाम केलेले वेलवेट शेले, पानवेली, रेडीमेड फुलांची कमान, झेंडू, अष्‍टर, शेवंतीची कृत्रिम फुले, झुंबर, दीपमाळा आदी सजावटीचे साहित्‍य भक्‍तांना भुरळ घालत आहे. यात अवघ्‍या पाच रुपयांपासून एक हजारांहून अधिक किमतीच्या वस्तू उपलब्ध आहेत. यंदा सजावटीच्या साहित्‍याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. महागाई वाढली असली तरी उत्‍सव जल्‍लोषात साजरा करण्याचे नियोजन भक्‍तांनी केल्‍याने खरेदीही जोरात सुरू आहे. गणेशमूर्ती आरस सजावट ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. गेल्या काही वर्षांत प्लास्‍टिक फुलांचे झुंबर, माळांमार्फत सजावट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. बाजारातून फुले विकत आणून सजावट करण्यापेक्षा कृत्रिम फुल माळा, झुंबरला ग्राहकांकडून पसंती मिळते आहे. याशिवाय रंगीबेरंगी रोषणाईच्या माळानाही मोठी मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90719 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..