पावशीत युरिया खताचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीत युरिया खताचे वाटप
पावशीत युरिया खताचे वाटप

पावशीत युरिया खताचे वाटप

sakal_logo
By

45844
पावशी ः शेतकऱ्यांना युरिया खताचे वाटप करताना सरपंच बाळा कोरगावकर. सोबत इतर.

पावशी ग्रामपंचायतीकडून
शेतकऱ्यांना युरिया खते
कुडाळ ः पावशी ग्रामपंचायत आयोजित शेतकरी बांधवांना ग्रामपंचायतीकडून युरिया खताचे वाटप करण्यात आले. मतदान कार्ड, आधार कार्ड लिंक करणे, ई-पीक नोंदणी, ७/१२ बाबतही मार्गदर्शन करण्यात आले. याचा जास्तीत जास्त ग्रामस्थनी लाभ घेतील, अशी ग्वाही सरपंच बाळा कोरगावकर यांनी दिली. यावेळी तहसीलदार प्रतिनिधी म्हसकर, सर्कल पास्ते, कुडाळ तलाठी तारी, पावशी तलाठी मसुरकर, कृषी सेवक जीवन परब, उपसरपंच दीपक आंगणे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शेलटे, सागर भोगटे, रुणाल कुंभार, ग्रामस्थ किशोर तवटे, पोलीस पाटील शेखर शेलटे, बाबा पावसकर, मनिष तोटकेकर, गणेश वायंगणकर, पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.
-------
आजगाव शाळेत ५ला सभा
सावंतवाडी ः जिल्हा परिषद आजगाव क्रमांक १ पूर्ण प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा होणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. शाळेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रामचंद्र प्रभू-झांट्ये, उपाध्यक्ष सूर्यकांत आडारकर, सचिव विलासानंद मठकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर व मोरजकर व कार्यकारिणीतील सर्व सदस्य कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. शतकोत्तर महोत्सवाच्या नियोजनासाठी येत्या ५ सप्टेंबरला सकाळी दहाला आजगाव मराठी शाळा सभागृहात माजी विद्यार्थी संघाने सभा आयोजित केली आहे. या सभेत शतकोत्तर कार्यक्रमांचे नियोजन करून विविध समित्या स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या सभेला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रामचंद्र प्रभू-झाट्ये यांनी केले आहे.
---------------------
आचरावस्तीसाठी बस पूर्ववत
मालवण ः कुडाळ रेल्वेस्टेशन-आचरा वस्तीची बस पूर्ववत करावी, अशी मागणी महाविद्यालयीन, माध्यमिक विद्यार्थी व अन्य प्रवाशांनी एसटीच्या कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार कुडाळ रेल्वे स्टेशन-आचरा बसफेरी पूर्ववत करण्यात आली. ही बस कांदळगाव रामेश्वर मंदिर येथे सकाळी ६.३० वाजता येणार आहे. बस पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी कांदळगाव येथील उमेश कोदे, सिध्दार्थ कदम, सतीश कदम, राजीव कदम, कुंदा तांबे, संजय कदम, ओमकार कांदळकर, उदय परब, शीतल परब, गणेश पाताडे, प्रवीण परुळेकर आदींनी केली
-------------------------
वेंगुर्लेत शालेय साहित्याचे वाटप
वेंगुर्ले ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेतर्फे येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन वेंगुर्लाचे अध्यक्ष सुनील रेडकर, सचिव पंकज शिरसाट, आरडीसी संजय पुनाळेकर, सदाशिव भेंडवडे, प्रा. आनंद बांदेकर, वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, प्रा. शिताळे, योगेश नाईक, सातार्डेकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर आदी उपस्थित होते. या पुढेही रोटरीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाईल, असे रोटरीचे अध्यक्ष सुनील रेडकर यांनी स्पष्ट केले.
----------------------
कोरगावकर, सावंत निबंधात प्रथम
वेंगुर्ले ः बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ’भारतीय संविधान नागरिकांसाठीचे मोठे वरदान’ यावर निबंध घेतलेल्या निबंध स्पर्धेत योगिता कोरगावकर व अनुजा सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक दिव्या शिवलकर, तृतीय सायली कुडपकर तर कनिष्ठ महाविद्यालयातून द्वितीय बापू वेंगुर्लेकर, तृतीय सिया मुणनकर या स्पर्धेसाठी यांनी पटकावला. परीक्षक म्हणून प्रा. पी. आर. गावडे यांनी काम पाहिले.
--------------
आयनलमध्ये गणेशघाटची सफाई
कणकवली ः आयनल शुभदा स्वयंसहाय्यता गटाने गणेशघाट परिसराची सफाई केली. भाग्यलक्ष्मी, आरती, शीतल, चंद्रकला, नम्रता, दीपाली साटम, मालती तोरसकर, सुवर्णा तोरसकर, संगीता कुबडे, संगीता चव्हाण, अनुसया चव्हाण, अनिता माने यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90730 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..