मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उल्हास परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरा तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी उल्हास परब
मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उल्हास परब

मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उल्हास परब

sakal_logo
By

45843
उल्हास परब


मडुरा तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी उल्हास परब
बांदा, ता. २६ ः मडुरा ग्रामपंचायत सभागृहात आज पार पडलेल्या ग्रामसभेत उल्हास परब यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सामाजिक कार्यातील तळमळ व सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. सरपंच साक्षी तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य माधुरी वालावलकर, ग्रामसेवक स्नेहा गवस, पोलिस पाटील नितीन नाईक तसेच ग्रामस्थ भगवान परब, जगन्नाथ परब, नकुल परब, कृष्णा गावडे, उदय चिंदरकर, दिलीप परब, बाबलो गुरव, सिद्धेश सावळ, बाबली परब, सौ. केरकर आदी उपस्थित होते. समितीमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावातील तंटे गावातच मिटविण्यावर आपला भर राहील. तसेच कोणताही दुजाभाव न करता सर्वांना सारखाच न्याय देण्यात येणार, असे यावेळी परब यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90760 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..