जिल्ह्यातील २०, ७०१ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील २०, ७०१ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान
जिल्ह्यातील २०, ७०१ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

जिल्ह्यातील २०, ७०१ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

sakal_logo
By

जिल्ह्यातील २०, ७०१ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

नियमित कर्जफेड शेतकरी; राज्याकडून ५० हजार, माहिती घेण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः राज्य शासनाने कर्जमाफी योजनेबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजनेत ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली. तीन वर्षांतील याद्या तयार झाल्या; परंतु, आता शासनाने यातील पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २० हजार ७०१ लाभार्थीना या प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी बँक, विकास संस्थांचे सर्वेक्षण, माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. शासनाच्या या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने थकीत कर्जदारांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत चार टप्प्यात कर्जमाफी योजना लागू करून गेले अनेक वर्षे थकीत कर्जदारांना या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला. यामुळे गेले अनेक वर्ष बँका, सोसायट्यांमध्ये शेती व अन्य कारणासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे मात्र कर्ज माफ झाले; परंतु, याच बरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजना लागू केली. याचा लाभ राज्यातील नियमित शेती कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून लाभ दिला जाईल, अशी घोषणा शासनाने केली होती. परंतु, गेल्या वर्षभरात ती मृगजळ ठरते की काय? अशी भीती शेतकरी वर्गात पसरली होती. मात्र, आता शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे २० हजार ७०१ शेतकऱ्यांना या ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात नियमित पीक कर्ज परत फेड करण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील शेतकरी नियमित कर्जफेड करण्याला प्राधान्य देतोत्यामुळे शासनाच्या कर्ज माफी योजनेचा लाभ अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास सोसायट्यांमधून दरवर्षी जून अखेर पीक कर्जाची थकबाकी वसुली करून नव्याने पिक कर्ज दिले जाते. त्याचबरोबर जिल्हा बँकेने खावटी कर्ज या नावाखालीही एक पिक कर्जाची योजना लागू केली होती. या योजनेतील लाभर्थींना राज्य शासनाने कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याकडे केली होती. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान योजनेतील लाभार्थी आणि सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याने नव्याने तयार केलेल्या खावटी कर्ज सारखी योजनेमध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळालेला नाही.
---------
चौकट
सप्टेंबरमध्ये अनुदान वितरित
महाविकास आघाडी शासनाने लागू केलेली ही योजना नव्या शिवसेना-भाजपा सरकारने कायम करत शेतकऱ्याना दिलासा दिला आहे. प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असल्याने त्यादृष्टीने सहकार प्रशासनाने ३२३ विकास संस्था, बँकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हे अनुदान वितरित होणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90766 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..