गणेशोत्‍सवात यंदा प्रबोधनावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्‍सवात यंदा प्रबोधनावर भर
गणेशोत्‍सवात यंदा प्रबोधनावर भर

गणेशोत्‍सवात यंदा प्रबोधनावर भर

sakal_logo
By

गणेशोत्‍सवात यंदा प्रबोधनावर भर
अलिबाग ः अवघ्‍या पाच दिवसांवर आलेल्‍या गणेशोत्‍सवाच्या तयारीसाठी घराघरांत लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेशमूर्तीसह काही ठिकाणी घरगुती सजावटीत समाज प्रबोधनपर देखावे, चलचित्र तयार करण्याचे नियोजन भक्‍तांनी केले आहे. ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘बेटी बचाओ’, ‘रक्‍तदान सर्वश्रेष्‍ठ दान’, अवयव दानाबाबत जागृती, मोबाईलचा अतिरेक टाळा आदी सामाजिक संदेश देणारे देखावे मंडळांकडून उभारण्यावर भर दिला जात आहे; तर काही ठिकाणी पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. गणेशोत्‍सवात पूर्वी केवळ मोठ्या शहरांमध्येच समाज प्रबोधन सजावटीवर भर दिला जायचा, आता उपनगरे, तसेच ग्रामीण भागांतही देखावे, चलचित्रे, सामाजिक संदेश देणारे उपक्रम मंडळांकडून घेतले जात अहोत.
--
धोधाणी-माथेरान प्रकल्पाला चालना
नवी मुंबई ः रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान गिरीस्थानाला पनवेलहून पोहोचण्यासाठी रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. धोधाणी ते माथेरान या डोंगर मार्गावर फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पासाठी नेमण्यात येणाऱ्या प्रकल्प सल्लागार आणि भागिदारीसाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनीही माहिती दिली.
धोधाणी ते माथेरान हे ४ किलोमीटर अंतराची पायवाट आहे. परंतू, अति दुर्गम रागांतून असून तीव्र चढउताराची असल्याने या ठिकाणी रोप वे करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने या मार्गावर फ्युनिक्युलर रेल्वे निर्माण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २००९ ला मान्यता दिली होती. याबाबतचा अहवाल सादर झाला आहे.
---
आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबिर
नागोठणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोंडगाव ग्रामपंचायतीमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा १०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. नागोठणे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये सुविधांचा अभाव आहे. रस्‍ते, आरोग्‍य सुविधांसाठी आदिवासी बांधवांची फरपट होत असल्‍याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासनाने दखल घेत कोंडगाव आदिवासी पाड्यावर रक्तदाब, मधुमेह, त्वचा रोग, नेत्र तपासणी शिबिर घेतले. या वेळी गरजूंना औषधांचे वाटपही करण्यात आले.
--
भेसळयुक्त मिठाई विकल्यास कारवाई
खारघर : गणेशोत्सव अवघ्‍या चार दिवसांवर आला असून बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह संचारला आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या रायगड विभागाचे सहायक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90773 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..