‘गणेशोत्सव स्पेशल’चा विस्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गणेशोत्सव स्पेशल’चा विस्तार
‘गणेशोत्सव स्पेशल’चा विस्तार

‘गणेशोत्सव स्पेशल’चा विस्तार

sakal_logo
By

‘गणेशोत्सव स्पेशल’चा विस्तार
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या एलटीटी-ठोकूर-एलटीटी या गणेशोत्सव स्पेशल रेल्वेच्या ‘अप’ व ‘डाऊन’च्या प्रत्येकी सहा फेऱ्या मेंगलोरपर्यंत वाढविल्या आहेत. प्रवाशांचा गणेशोत्सव रेल्वेगाड्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एलटीटी ठोकूर (०११५३) २८, २९, ३० ऑगस्ट तसेच १, २, ३ सप्टेंबरला रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला मेंगलोरला पोहोचेल. ठोकूर - एलटीटी (०११५४) २९, ३०, ३१ ऑगस्टला तसेच २, ३, ४ सप्टेंबरला सायंकाळी पावणेपाचला मेंगलोर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी दीडला एलटीटी येथे पोहोचेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
---------------
‘जलक्रीडां’ना परवानगीची मागणी
मालवण ः जलक्रीडा व्यवसाय शासन नियमानुसार १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे; परंतु शासकीय आदेशाप्रमाणे यावर्षी जलक्रीडा व्यवसाय करण्यासाठी पर्यटन संचालनालय, नवी मुंबई यांची परवानगी आवश्यक आहे. जलक्रीडा व्यावसायिकांनी या विभागाकडे शासकीय फी भरून ऑनलाईन पद्धतीने मागणी अर्ज सादर केला आहे; परंतु पर्यटन संचालनालय येथे हे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्यांच्या बोट मेरीटाईम बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत, अशा व्यावसायिकांना सप्टेंबर २०२२ पासून जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच ही परवानगी एक खिडकी पद्धतीने देण्यात यावी, अशी मागणी कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू तथा बाबा मोंडकर यांनी केली आहे.
---
वर्देसाठी जादा बसफेरीची मागणी
कुडाळ ः कुडाळ आगारातून दुपारी साडेतीनला वर्देकडे मार्गस्थ होणारी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांतर्फे सरपंचांनी कुडाळ आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या वर्दे गावात सावंतवाडी-ओरोस-वर्दे अशी दिवसातून सकाळी एकमेव बसफेरी सुरू आहे. अगदी जवळ येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात ग्रामस्थांची तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांची कुडाळ शहरात खरेदीसाठी, रेल्वेस्थानक, दवाखाना आदी ठिकाणी ये-जा सुरू असते; परंतु गावात एकच बसफेरी सुरू असल्याने सायंकाळच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे दुपारी साडेतीनला कुडाळवर्दे बसफेरी सुरू करावी.
-------------------
ई-केवायसीबाबत आवाहन
मालवण ः पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले. लाभार्थ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन आधारकार्डवर लिंक असलेल्या मोबाईल नंबरला ओटीपी टाकून किंवा बायोमेट्रिक वापरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90869 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..