ग्रामीण भागातील समस्यांबाबत हळबे महाविद्यालयात मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील समस्यांबाबत
हळबे महाविद्यालयात मार्गदर्शन
ग्रामीण भागातील समस्यांबाबत हळबे महाविद्यालयात मार्गदर्शन

ग्रामीण भागातील समस्यांबाबत हळबे महाविद्यालयात मार्गदर्शन

sakal_logo
By

45906

दोडामार्ग ः उपस्थित व्याख्यात्यांचे स्वागत करताना डॉ. सावंत.

ग्रामीण भागातील समस्यांवर
हळबे महाविद्यालयात भाष्य
दोडामार्ग, ता. २७ : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात ‘उन्नत महाराष्ट्र अभियान-आपले प्रश्न-आपले विज्ञान’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील ‘रिसर्च आणि आविष्कार’ विभागातर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील ग्रामीण क्षेत्र हेतू औद्योगिक विकास केंद्र, सितारा, भारतीय प्रयोगीय संस्था मुंबईचे पार्थ बाबर आणि हर्षद तुळूपुले यांनी विद्यार्थी, प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
स्वतःच्या परिसरातील प्रश्न, गावातील छोटे-मोठे व्यापारी, उद्योगधंदे, गणेशमूर्ती व्यवसाय, रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक व सांस्कृतिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प कसा तयार करावा, हे यावेळी सांगितले. तसेच महाविद्यालयातील प्रत्येकाने आपापल्या विषयांतर्गत येणाऱ्या विषयाचा गावातील समस्यांचा अभ्यास करून त्या समस्यांची उकल करावी किंवा संशोधन प्रकल्प अहवाल तयार करावा, असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी विद्यार्थ्यांना गावातील समस्यांची उकल कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. एस. यू. दरेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. एस. इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90876 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..