संस्कृती सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृती सदर
संस्कृती सदर

संस्कृती सदर

sakal_logo
By

२१ ता. मुख्य पा २ वर सदर आहे.
....
लोगो ..........संस्कृती
........
-rat२७p५.jpg
L45910
ः अंजली बर्वे
----------
इंट्रो
सगळ्याच रूढी, परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नाही तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आंधळा आहे. अतिशय डोळसपणे आणि दूरदृष्टीने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी जतन व्हाव्यात, म्हणून युक्ती-प्रयुक्ती करून साध्य केलेले पाहून आश्चर्य वाटते. हरतालिका आणि श्री गणेश यांना वाहण्यात येणारी पाने पाहिलीत तर ऋषिमुनींनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून मार्गदर्शन केले आहे, हा दावा सिद्ध होतो.
-अंजली बर्वे, चिपळूण
-----------------------
पर्यावरण जतन पूजा परंपरेतून

श्रावण सरला, भाद्रपद सजला! घराघरात श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. बाजारपेठा फुलल्या. धूपदीप, अगरबत्ती, आसन, मखर, सजावटीचे सर्व सामान सज्ज झाले. आता उद्या-परवा हरतालिकांच्या सुबक, गौरमूर्ती आणि पत्री दिसू लागतील. पुन्हा पुन्हा तेच अधोरेखित करावे, असे विचार म्हणजे आपल्या ऋषिमुनींनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून आपल्याला केलेले मार्गदर्शन!
चरकसुत्रात असे म्हटले आहे की, ''न अनौषधं जगति, किंचित द्रव्यं उपलभ्यते!''म्हणजे ज्याचा औषध म्हणून उपयोग होत नाही, असे एकही द्रव्य जगात नाही. असे असले तरी मानवी आजारांवर काही वनस्पती खूप उपयुक्त असतात. त्यातील हरतालिका पत्रि होत. पाहा ना! बेलाचा उपयोग दमा, कफ, सूज, कावीळ, आम्लपित्त, कृमी, अजीर्ण, मधुमेह, उदरविकार, हृदयविकार, रक्तदाब, आव, उन्हाळा आणि मानसिक त्रास इत्यादींमध्ये होतो. बेलाची पाने आणि फळे यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्रिशुलाप्रमाणे असलेली ही तीन पाने उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक म्हणून पाहिली जातात. बिल्व मोक्ष देणारा, लक्ष्मीचे तिथे निवासस्थान आहे, असेही मानले जाते. ही पाने शंकराला प्रिय असून रावणाचा वध करायला गेलेल्या रामाने जाताना आधी याच वृक्षाची पूजा केली, असा उल्लेख वाचनात येतो. या सगळ्या श्रद्धांमुळे बेलवृक्षाचे जतन केले जाते, हेच महत्वाचे आहे. याचप्रमाणे कान, त्वचा, मुतखडा, दंतधवन यासाठी आघाडा वापरला जातो. मधुमालती त्वचाविकारासाठी, दुर्वा रक्तवाढीसाठी आणि शीतलगुणी, बोराच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो. कण्हेर विषारी आहे, तरीही जाणकार तिचा वापर अल्प प्रमाणात हृदयविकार आणि विषमज्वर यासाठी करतात. आमवात, सांधेदुखीसाठी रुई, विष्णूप्रिया तुळस रक्त शुद्ध करणारी आणि ऑक्सिजन पुरवणारी, आंब्याचा टाळा तर शुभ संकेत म्हणून दाराला लागतो. कलश यानेच शोभतो. या झाडाचा मोहर धुपणी, अतिसार, प्रमेह, पोटशूळ यावर उपयोगी ठरतो. डाळिंबांचे दाणे आणि साल जुलाब, अरुची, आम्लपित्त, कृमी यावर काम करते. जाई आणि बकूल हे शब्दच मनमोहक सुगंध पसरवतात. ॲरोमा थेरपीत यांना महत्त्व आहेच. आणखीही औषधी गुण आहेतच. मारवा आणि अशोक हेही लोकप्रिय नसले तरी बहुगुणी आहेत, असा या सर्वच पानांचा उपयोग विविध आजारांवर होतो. इथे सर्व माहिती देण्याचा उद्देश नाही. काही उदाहरणे देऊन आपल्या परंपरांचे महत्त्व समजून घ्यावे, हाच उद्देश आहे.
आज पर्यावरण, वृक्षजतन, संवर्धन हे विषय ऐरणीवर आले आहेत. नगरविस्तार, रस्ता रुंदीकरण, रेल्वे या विकासासाठी आवश्यक कारणांमुळे जशी जंगलतोड होते, तशीच अवैध जंगलतोडही होते. धर्म आणि कर्मकांडासाठी तरी लोकांना काही झाडांचे महात्म्य पटते आणि ती जतन केली जातात, हेही नसे थोडके! आपल्याला मांगल्य, पावित्र्य, सुखसमाधान यांचा अनुभव देणारी ही निसर्ग देवता! तिचे सौंदर्य आणि वैविध्य जपणे आपल्याच हातात आहे. शेवटी असेच मागणे श्री गणेशचरणी करूया की, ''श्रद्धा आणि ज्ञानलालसा असणारी साधना आमच्याकडून होईल अशीच बुद्धी दे!''
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90894 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..