गणेशोत्सव काळात गस्त वाढवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव काळात गस्त वाढवावी
गणेशोत्सव काळात गस्त वाढवावी

गणेशोत्सव काळात गस्त वाढवावी

sakal_logo
By

45926
बांदा ः पोलिसांना निवेदन देताना प्रशांत माधव, विश्वनाथ नाईक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

गणेशोत्सव काळात गस्त वाढवा

प्रशांत माधव ः बांदा पोलिसांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देणे, तसेच पितळीची भांडी चकाकण्यासाठी निरनिराळ्या पावडर दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना पाडलोसमध्ये यापूर्वी घडल्या आहेत. सध्या गणेशोत्सव कालावधी असल्यामुळे आणि अशा भुरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी दिवसातून एक वेळा पोलिस गस्त असावी. त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसेल, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत ऊर्फ बंड्या माधव यांनी बांदा पोलिसांकडे केली.
याबाबत बांदा पोलिस कर्मचारी रसिका माळकर, रंजना गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पाडलोस सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ नाईक उपस्थित होते. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे म्हणाले की, अशा चोरट्यांपासून पहिल्यांदा नागरिकांनी सावध असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन संपूर्णपणे सहकार्य करेल. भांड्यांना चकाकी आणणे, दागिने पॉलिश करून देतो, असे सांगताना कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांनी गावातील पोलिस पाटील किंवा बांदा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. परिसरात गस्त वाढविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90898 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..