रत्नागिरी- आविष्कारमध्ये गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आविष्कारमध्ये गणेशोत्सव
रत्नागिरी- आविष्कारमध्ये गणेशोत्सव

रत्नागिरी- आविष्कारमध्ये गणेशोत्सव

sakal_logo
By

-rat२७p१२.jpg-
45916
रत्नागिरी : आविष्कार संस्थेमधील गणेशोत्सवात भजन करताना विद्यार्थी, कर्मचारी.
------
लोगो- येई गणेशा
------
आविष्कारमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना; विश्‍वकल्याणाची प्रार्थना
गणेशोत्सव साजरा; मूर्ती, विसर्जन पर्यावरणपूरक, विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन
रत्नागिरी, ता. २८ ः श्री गणपती म्हणजे विद्या, कलांची देवता. या देवतेची आराधना करून त्यात सारे भाविक तल्लीन होतात. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे शाळांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातो. दिव्यांगांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेनेही शाळा व कार्यशाळेत बाप्पांची प्रतिष्ठापना केली. त्याची पूजाअर्चा करून आरत्या, भजने गायली. आविष्कार संस्थेमध्ये सौ. सविता कामत विद्यामंदिर व शामराव भिडे कार्यशाळेचा एकत्रित गणेशोत्सव आनंदाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना कालावधीनंतर साजऱ्या होत असलेल्या या उत्सवात बा विघ्नहर्ता साऱ्यांचे कल्याण कर, अशी प्रार्थना करण्यात आली.
इंद्रधनुष्याच्या रंगांच्या पताका लावून सजावट करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरून गणेशमूर्तीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत काढण्यात आली. या वेळी मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यानंतर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आरत्या झाल्या. मग गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर वंडकर सभागृहात शाळा व कार्यशाळा एकत्रित विद्यार्थी, कर्मचारी यांनी भजन सादर केले. सर्व मुलांनी यात आनंदाने सहभाग घेतला. कोणाला भजन पाठ होते तर कोणी ऐकून साथ देत होते. हळुहळू म्हणायला शिकत होते. एकंदरित शाळेत गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळाला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा सण, उत्सवांचा फायदा होत असतो. त्यामुळे संस्थेतर्फे गेली अनेक दशके हा उत्सव साजरा होत आहे.
..
चौकट
इकोफ्रेंडली विसर्जन
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशमूर्तीची पूजा, आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी झिम्मा फुगडी, गौरीचे खेळ खेळले. गाणी म्हटली व जाखडी नृत्य सादर केले. दुपारी अंतुलित बलधाम उपासकांनी भजन केले. त्यानंतर गणेशमूर्तीची मिरवणूक काढून शाळेच्या पाठीमागे टबमध्ये श्री गणेशाचे इकोफ्रेंडली विसर्जन करण्यात आले.
..
चौकट
गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन
उत्सवासाठी कार्यशाळेत निदेशक दीप्तेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांकडून लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यात आली. प्रत्येक वर्गात तयार केलेल्या गणपतीच्या कलाकृतींचे तसेच विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90918 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..