राजापूर ः आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य
राजापूर ः आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य

राजापूर ः आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य

sakal_logo
By

सुखद काही ...................लोगो
...................
-rat२७p११.jpg
45915
ः राजापूर ः शैक्षणिक साहित्य वाटप करताना मैत्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
---------
आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य

मैत्री प्रतिष्ठान; घेतल्या स्पर्धाही, ७० विद्यार्थ्यांपर्यंत पोचला ग्रुप
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः तालुक्यातील कोंड्ये येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्थापना केलेल्या मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोंड्ये येथील जनता विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी संघटित होत मैत्री प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवले जातात. त्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या या मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच राबवला.
या वेळी मैत्री प्रतिष्ठानचे हरेश जोगले, अनेश जुवळे, अनिकेत पवार, मंदार पांचाळ, प्रियंका मोरे, कोमल घाणेकर, प्रथमेश सावंत, नीलेश कुवळेकर, प्रशांत सावंत, दीपक चौकेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मैत्री प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
..
चौकट
५३ विद्यार्थ्यांना विविध साहित्‍य
रायगड जिल्ह्यातील खानंद (ता. कर्जत) येथील शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील ५३ विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, रंग खडू, स्वाध्याय पुस्तिका आदी शैक्षणिक साहित्याचे मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच वाटप करण्यात आले. त्याचवेळी अंगणवाडीतील २० मुलांना पाटी व खडूचे बॉक्सही देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने घेतलेल्या मुलांच्या रंगभरण स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांना मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने बक्षिसे देऊन गौरवले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90920 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..