गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक
गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक

गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक

sakal_logo
By

-rat२७p१.jpg
L45893
ः रत्नागिरी ः गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे कौतुक करताना उद्योगमंत्री उदय सामंत.
------------
गणराज तायक्वॉंदो क्लबच्या
खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेतील यशाबद्दल रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी हार्दिक अभिनंदन केले. देवरूख येथे आयोजित क्युरोगी स्पर्धेत दुसरा तर पुमसे स्पर्धेत तिसरा सांघिक क्रमांक मिळवत रत्नागिरी तालुक्याने घवघवीत यश संपादन केले. गणराज तायक्वॉंदोचे १५ खेळाडू सहभागी झाले. क्युरोगी म्हणजे फाईट प्रकारात स्पेशल, सबज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि सीनिअर अशा विविध गटात यश मिळवले. क्युरोगीमध्ये सुवर्णपदक सुरभी पाटील, केशर शेरे, स्मित कीर, रुद्र जाधव, त्रिशा मयेकर, गायत्री शेलार यांनी मिळवली. क्युरोगीमध्ये रौप्यपदक राधिका जाधव, गौरी विलणकर, प्रशांत मकवाना, प्रज्ञेश शेरे यांनी मिळवले. क्युरोगीमध्ये कास्यपदक आद्या कवितके, तनिष्क कामतेकर, उर्वी कंळबंटे, स्वानंद तुपे, आधिराज कवितके यांनी केली. या स्पर्धेत स्मित कीर सबज्युनिअर या वयोगटामध्ये बेस्ट फायटरचा किताब म्हणून सन्मानित करण्यात आले.
----------
रामपूर एज्युकेशन सोसायटीची आज सभा
चिपळूण ः रामपूर एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) मिलिंद हायस्कूल रामपूर येथे सकाळी ११.३० वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शोकप्रस्ताव, मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी, २०२१- २२ चा ताळेबंद अहवाल सादर करणे, २०२२-२३ करिता परिक्षकांची निवड करणे, अध्यक्षांच्या अनुमतीने सभेपुढे आयत्या वेळेला येणाऱ्या इतर विषयावर चर्चा केली जाणार आहे. गणसंख्येअभावी सभा तहकूब करावी लागणारी ही सभा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी घेतली जाईल. त्या वेळी गणासंखेचे बंधन राहणार नाही, याची सभासदांनी नोंद घ्यावी. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, सहसेक्रेटरी सुरेश साळवी यांनी केले आहे.
----------
केसरूळे-हेळवाक मार्गावर खड्डेच खड्डे
चिपळूण ः विजापूर-गुहागर रस्ता अत्यंत निकृष्ट झाला असून, प्रवासासाठी अत्यंत खराब झाला आहे. हेळवाक-केसरूळे, देववाक - प्रारण, कुंभार्ली घाट, शिरगाव-पोफळी सर्वत्र खोल खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे डबकी तयार झाली आहेत. येथे अपघाताची दाट शक्यता आहे. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कुंभार्ली घाटातही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनानेही तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा सुखकर प्रवास होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कोकण प्रवासी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.
----------

---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90921 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..