संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो जूना आहे
...
-rat25p3.jpg
45463
- पावस ः देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत स्वामी स्वरूपानंद प्रशालेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-----------
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर
विशेष पुरस्काराने सन्मानित
पावस ः लोकमान्य मल्टीपर्पज प्रायव्हेट लि. आयोजित ''वंदे मातरम'' या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभक्तीपर गीताला साजेसे आवेशपूर्ण उत्तम सादरीकरणामुळे हा विशेष पुरस्कार या प्रशालेला देत आहोत, असे परीक्षकांनी सांगितले. या स्पर्धेसाठी प्रशालेचे क्रीडा विभागप्रमुख अलकुटे यांनीसुद्धा सहकार्य केले होते. या स्पर्धेमध्ये वेदांगी चक्रदेव, निधी माने, दिशा साळवी, राधिका देशमुख, शांभवी बापट,अनुष्का जाधव, सिद्धी गुरव, सृजा डोर्लेकर, स्वराली घवाळी, रसिका पाटील, ऐश्वर्या पाटील, सृष्टी कुंभार या विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. त्याला की बोर्डवर प्रशालेच्या स्वर-ताल विभागप्रमुख मुग्धा पालकर, त्याचप्रमाणे ताशा- वरद जोशी आणि हलगी- प्रणव गुरव यांनी साथ दिली.
---------------------
दापोली अर्बनमध्ये व्याख्यान
दाभोळ ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा-केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ''इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस'' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. मिली पॉल जगातील शेअर बाजारातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देत विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कशाप्रकारे बचत व गुंतवणूक करावी तसेच गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, या विषयी माहिती दिली. महेक पठाण, उमेर फाकी व नुहीद मिरकर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्यांशी या विषयावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चा केली.
----------
आदिवासी कल्याण संस्थेतर्फे कार्यक्रम
खेड ः आंतरराष्ट्रीय आदिवासीदिनानिमित्त ''आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था'' पुणे यांच्यासह खेड तालुक्यातील आदिवासी लोकांनी एकत्र येऊन विशेष कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. खेड तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या वडगाव, बिरमणी, कांदोशी, आस्तान या गावातील आदिवासी समाजातील लोक जागतिक आदिवासीदिनी एकत्र आले. आदिवासी वेशभूषा, आदिवासी नृत्य, गाणी, ओव्या असे विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेचे अध्यक्ष अनंत कांबळे, उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, सचिव अजय नलावडे उपस्थित होते.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90927 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..