चिंदर-भगवंतगड रस्त्याचा प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंदर-भगवंतगड रस्त्याचा
प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी
चिंदर-भगवंतगड रस्त्याचा प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी

चिंदर-भगवंतगड रस्त्याचा प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी

sakal_logo
By

45960
आचरा ः चिंदर-भगवंतगड रस्त्याच्या कामाची पाहणी करताना संबंधित.

चिंदर-भगवंतगड रस्त्याचा
प्रश्‍न पाठपुराव्यामुळे मार्गी

दत्ता सामंतांच्या औदार्याचे कौतुक

आचरा, ता. २७ : आचरा-भगवंतगड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चिंदर-आचराच्या लोकप्रतिनिधींनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधल्यानंतर सामंत यांनी खड्डे मुजविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याने चिंदर-भगवंतगड रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला. सामंत यांच्या औदार्याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. चिंदर-भगवंतगड रस्ताही खड्डेमय झाला आहे. या रस्त्याने स्थानिक ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले होते. याबाबत जेरोन फर्नांडिस, संतोष कोदे यांनी श्री. सामंत यांचे लक्ष वेधत साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सामंत यांच्या माध्यमातून खड्डे मुजविण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देत खड्डे मुजविण्याचे कामही हाती घेण्यात आले. ग्रामस्थांची खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी माजी बांधकाम सभापती फर्नांडिस, माजी सरपंच संतोष कोदे, उद्योजक जयप्रकाश परुळेकर प्रयत्नशील होते. सामंत यांनी साहित्य उपलब्ध करून दिल्यावर खड्डे मुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. याकामी लागणाऱ्या जेसीबीची सोय जयप्रकाश परुळेकर यांनी केली. गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे मुजवल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90951 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..