कणकवली कॉलेज चमकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली कॉलेज चमकले
कणकवली कॉलेज चमकले

कणकवली कॉलेज चमकले

sakal_logo
By

45965
कुडाळ : येथील सांस्कृतिक युवा महोत्‍सवात बक्षीस स्विकारताना कणकवली कॉलेजचे विद्यार्थी.


कणकवली कॉलेज चमकले

कुडाळचा युवा महोत्सव; मुंबईतील अंतिम फेरीसाठी संधी

कणकवली, ता.२७ : मुंबई विद्यापीठामार्फत ५५वा आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव कुडाळ येथील संत राऊळ महाराज विद्यालयात झाला. यातील विविध नऊ कला प्रकारांमध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीच्या स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे.
कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका (मराठी), प्रहसन (मराठी), भारतीय लोकनृत्य या सामूहिक कलाप्रकारांमध्ये यश मिळवले. तर वैयक्तिक कलाप्रकारांमध्ये रिद्धी अमोल मोरवेकर - मिमिक्री, प्रेरणा प्रदीप चिंदरकर - कथाकथन, (इंग्रजी), मृणाल मिलिंद गावकर - कथाकथन (मराठी), वेदांत मंगेश कुयेस्कर - तबलावादन, सलोनी महेश मेस्त्री-भारतीय सुगम गायन तर प्रतिभा किशोर परब आणि रश्मी रवींद्र साटम - वादविवाद (हिंदी) हे कलाप्रकार अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. डॉ. मारोती चव्हाण, प्रा.मीनाक्षी सावंत, प्रा.सीमा हडकर, प्रा.सचिन दर्पे, प्रा.दीपा तेंडोलकर, प्रा.स्वीटी जाधव, प्रा.अरविंद उमरीकर आणि श्री विलास कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
--
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाही सांस्कृतिक विभागात मानाचा तुरा रोवल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90955 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..