मंडणगड- घटनाकारांच्या तालुक्याला पूर्णवेळ न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड- घटनाकारांच्या तालुक्याला पूर्णवेळ न्यायालय
मंडणगड- घटनाकारांच्या तालुक्याला पूर्णवेळ न्यायालय

मंडणगड- घटनाकारांच्या तालुक्याला पूर्णवेळ न्यायालय

sakal_logo
By

Rat27p4.jpg ः
L45896
भिंगळोली ः न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यासाठी निवडण्यात आलेली जागा व इमारत.
---------------------
घटनाकारांच्या तालुक्याला पूर्णवेळ न्यायालय
अनेक दशकांची समस्या ; नागरिकांचा वाचणार हेलपाटा
मंडणगड, ता. २८ः देशाचे संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव असणाऱ्या तालुक्याला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पूर्णवेळ न्यायालय मंजूर झाल्याने अनेक दशकांची समस्या मार्गी लागली आहे. ज्या घटनेवर देश चालवला जातो त्यांच्या मूळगाव असणाऱ्या मंडणगड तालुक्याला यामुळे न्याय मिळाल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.
मंडणगड तालुक्यासाठी पूर्णवेळ न्यायालय मंजूर झाल्याचे पत्र मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांना २४ ऑगस्टला पाठवले आहे. या संबंधी बार असोसिएशनचे मंडणगडचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे यानी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या मंडणगड तालुक्यात तालुका मुख्यालयी न्यायलयाचे कामकाज सुरू व्हावे याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी पूर्णवेळ न्यायालयाचे कामकाज सुरू व्हावे याकरिता नियमानुसार आवश्यक जागेचा शोध घेण्यात आला.
मंडणगड तालुक्याच्या न्यायालयाचे कामकाज दापोली येथील न्यायालयात सुरू आहे. यामुळे तालुक्यातील काही गावातील नागरिकांना न्यायालयाच्या कामकाजासाठी ८० किमीचा प्रवास करावा लागत आहे. न्यायालयाचे कामकाज तातडीने सुरू व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भिंगळोली येथील अॅक्टिव्हिटी सेंटर न्यायालयाचे व्यवस्थापनाकरिता ताब्यात घेण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने हिरवा कंदील दिला असून आवश्यक ठराव संबंधितांकडे पोहच झाले आहेत. त्यामुळे लवकरच मंडणगड तालुक्याचे स्वतःचे हक्काचे न्यायालयाचे कामकाज मंडणगडमध्ये सुरू होणार आहे.
-------------------------
चौकट
बार असोसिएशन मंडणगडचा पाठपुरावा
बदलत्या काळात भारतीयांना संविधानाच्या रूपाने जगण्याचा मूलमंत्र देणाऱ्या या महानायकाचा मूळ तालुकाच स्वातंत्र्योत्तर कालखंडात वंचित राहिला आहे. नागरिकांची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी बार असोसिएशन मंडणगड पाठपुरावा करत आहे. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायलय मुंबई याकरिता सकारात्मक असून, आवश्यक सोईसुविधांच्या निर्मितीसाठी राज्यशासनाचे उत्तम सहकार्य लाभणार आहे. नजीकच्या काळात मंडणगड तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयाचे कामकाज सुरू होईल, असे अॅड. लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90961 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..