राजापूर-राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत लवकरच बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत लवकरच बैठक
राजापूर-राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत लवकरच बैठक

राजापूर-राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत लवकरच बैठक

sakal_logo
By

-rat२७p२०.jpg
L45986
-राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंबंधी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करताना ग्रामस्थ.
---------------
राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत बैठक घेणार

मंत्री रवींद्र चव्हाण; समस्या जाणून घेतल्या, कामांचीही पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गासंबंधी राजापूरमधील समस्या जाणून घेतल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, आमदार राजन साळवी, कोंढेतडचे माजी उपसरंच अरविंद लांजेकर यांनी एसटी डेपोसमोरील रखडलेल्या कामासह नदीपात्रातील गाळ आणि महामार्गासंबंधी समस्या श्री. चव्हाण यांच्यासमोर मांडल्या.
श्री. चव्हाण यांचे तालुक्यामध्ये आगमन झाल्यानंतर एसटी डेपोसमोर त्यांचे पदाधिकाऱ्‍यांनी स्वागत केले. त्यांनी एसटी डेपोसमोरील महामार्गाच्या रखडलेल्या कामासंबंधी माहिती देताना याकडे भुयारी मार्ग आवश्यक असल्याची मागणी केली. श्री. चव्हाण यांनी यासंबंधी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्‍वासन केले. या ठिकाणी आमदार श्री. साळवी यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी नगरसेवक विनय गुरव, शहरप्रमुख संजय पवार आदींसह सेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनीही भेट घेत महामार्गाच्या रखडलेल्या कामासंबंधी त्यांना माहिती दिली.
..
चौकट
प्रश्‍नांकडे लक्ष वेधले..
शासकीय विश्रागृहाच्या येथे आमदार साळवी यांच्यासह शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष हातणकर, भाजपचे कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी नदीपत्रातील साचलेला गाळ, शिळ-गोठणे दोनिवडे-चिखलगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधून घेतले. शीळ-गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील माजी सरपंच नामदेव नागरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर विचारे आदी उपस्थित होते. याठिकाणी संरक्षक भिंत आणि गाळ उपशाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे चव्हाण यांनी आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90988 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..