रत्नागिरी- सर्व मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सर्व मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' यंत्रणा
रत्नागिरी- सर्व मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' यंत्रणा

रत्नागिरी- सर्व मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' यंत्रणा

sakal_logo
By

पा ३
...
46000
मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' यंत्रणा

संजय मोहिते ः लॅंडिंग पॉइंटवर सीसी टीव्ही, सागरी सुरक्षा मजबुतीसाठी प्रयत्न

रत्नागिरी, ता. २७ : कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज आहे. काही जमेच्या तर काही तोट्याच्या बाजू लक्षात आल्या. त्यात सुधारणा करण्यासाठी नौदल, कोस्टगार्ड आणि पोलिस यांची नुकतीच बैठक झाली. मच्छीमार हाच सर्वांत मोठा इंटलिजन्ट असून, त्याच्याकडून किनारपट्टीवरील बारीक-सारीक हालचालींची माहिती मिळते. म्हणून किनारट्टीवरील सर्व मच्छीमारी नौकांवर आता ''एआयएस'' (अॅटोमेटेड आयडेंटीफिकेशन सिस्टीम) यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व लॅंडिंग पॉइंटवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी मोहिते म्हणाले, रायगडमधील हरिहरेश्वर येथील भरकटत आलेल्या नौकेचा तपास लगेच झाला. परंतु यानिमित्ताने सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कोकणातील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तत्काळ नौदल, तटरक्षक दल आणि पोलिस दलाची बैठक घेतली. या बैठकीत समुद्रातील हालचालीची माहिती वेगाने सुरक्षा यंत्रणेला मिळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार झाला. समुद्रात हजारो मच्छीमारी नौका मासेमारीसाठी दिवस-रात्र असतात. यातील परकीय किंवा घुसखोरी करणारी नौका कोणती हे समजणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक मच्छीमारी नौकांवर एआयएस ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. यामुळे त्या-त्या बोटीच्या समुद्रातील मार्ग ट्रॅक करता येतो. परंतु बहुतेक नौकांवर एआयएस ही यंत्रणाच नाही. ही गंभीर बाब असून मेरीटाईम बोर्डाकडून सर्व मच्छीमारी नौकांवर एआयएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. समुद्रातील माहिती देणारा सर्वांत इंटेलिजन्ट माणूस हा मच्छीमार आहे. त्यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे.
किनाऱ्यावरील घुसखोरी रोखण्यासाठी सर्व लॅंडिंग पॉइंटवर सुरक्षा रक्षक नेण्यात आले आहेत. परंतु त्यांना ड्रेसकोड, ओळखपत्राचा प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षक नेमून त्यांच्याकडून थेट सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळावी, यासाठी काम सुरू आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक लॅंडिंग पॉइंटवर सीसी टीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या काही घटनांचा विचार करता सागरी सुरक्षा अधिक मजबूत आणि तगडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मोहिते यांनी सांगितले.
--------------
चौकट-
पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी मिऱ्यावर केंद्र
सागरी सुरक्षेमध्ये समुद्रात ५ नॉटिकल मैल एवढीच हद्द पोलिस दलाकडे आहे. या हद्दीमध्ये पोलिसांची किंवा मत्स्य विभाग, कस्टमला बरोबर घेऊन संयुक्त गस्त घातली जाते. पोलिस दलाची सुरक्षा अजून मजबुत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस दलाने मिऱ्या येथे एक ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. पोलिस दलात भरती होणारे राज्यातील अनेक भागातून येता. त्यांना ८ ते १५ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पोहणे, समुद्रात शस्त्र चालविणे, बचाव कार्य आदीचे प्रशिक्षण सुरू आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90993 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..