चिपळूण ः महामार्गाच्या दूरवस्थेबाबत मंत्र्यासमोर संताप व्यक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः महामार्गाच्या दूरवस्थेबाबत मंत्र्यासमोर संताप व्यक्त
चिपळूण ः महामार्गाच्या दूरवस्थेबाबत मंत्र्यासमोर संताप व्यक्त

चिपळूण ः महामार्गाच्या दूरवस्थेबाबत मंत्र्यासमोर संताप व्यक्त

sakal_logo
By

- ratchl271.jpg
L45940
ः चिपळूण ः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना महिला पदाधिकारी.
-------------
महामार्गाच्या दूरवस्थेबाबत मंत्र्यासमोर संताप

महिला धडकल्या; कापसाळ गावात झेब्रा क्रॉसिंगची गरज
चिपळूण, ता. २७ ः मुंबई-गोवा महामार्ग पुरता खड्ड्यात गेला आहे. परिणामी महामार्गावरून प्रवास करणारे चालक व प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे महामार्ग खड्डेमुक्त करून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्याची मागणी अग्रिमा महिला संघ रत्नागिरी जिल्हा व एकता गावस्तरीय महिला समिती कापसाळ, या महिला संघटनांनी केली. चिपळुणातील शासकीय विश्रामगृहात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना त्यानी याबाबत निवेदन दिले. या महिलांनी मंत्र्याशी चर्चाही केली. चर्चेअंती मंत्र्यांनी महामार्गासंबंधित अडचणी तातडीने दूर केल्या जातील, असे आश्वासन दिले.
महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या कापसाळ गावात सर्व्हीस रोड (अंडरपास) व झेब्रा क्रॉसिंगची आवश्यकता आहे. या रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करावे, अशी या माहिलांनी मागणी केली. राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची कार्यवाही करावी, या कामी त्यांनी महिला संघटना तसेच ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. महामार्गातील खड्डे हॉटमिक्सचा (वाळू, सिमेंट, डांबर यांचा) वापर करून युद्धपातळीवर बुजवावेत. दरड घसरण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षित कठडे बांधा, लोटे येथून चिपळूण येथे चिरणी-आंबडस या पर्यायीमार्गे वाहतूक केली जाते. या रस्त्याचे आवश्यक तेथे रुंदीकरण करा, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. झालेल्या कामाचे तज्ञ समितीकडून मूल्यांकन करून निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी केली. या वेळी अग्रिमा महिला संघ, रत्नागिरी जिल्हा निमंत्रक शामल कदम, एकता गावस्तरीय महिला विकास समिती कापसाळच्या अध्यक्षा स्वाती साळवी, उपाध्यक्षा मंजुषा साळवी, सचिव मीनल बांदेकर, उपसरपंच ऋती कांबळी आदी महिला उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90998 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..