रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  जिल्हा रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी
रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी

रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी

sakal_logo
By

-rat२७p१८.jpg
L45941
-रत्नागिरी ः जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
--------------------
जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटींचा निधी देवू

दुरुस्तीसाठी कृती आराखडा बनवण्याचे बांधकाम मंत्री चव्हाणांचे आदेश
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात गळती असून, तातडीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी निधी तातडीने उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी रुग्णालयातील अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ॲक्शन प्लॅन (कृती आराखडा) तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. या संदर्भात येथील सर्व लोकप्रतिनिधी तसेच मंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चव्हाण यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. दोन मजली व सुमारे २२५ खाटांची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे. श्री. चव्हाण प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हणाले, रत्नागिरीमधील हे प्रमुख शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये अनेक गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयातील डॉक्टर्स हे चांगल्या पद्धतीने येथील रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांनी चांगल्या वातावरणामध्ये आरोग्यसेवा करणे देखील फार महत्वाचे आहे. आवश्यक सर्व सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. आपण स्वत: आणि स्थानिक आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सर्वजण मिळून यामध्ये अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.
सर्व व्यवस्था सुधारणांसंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयातील स्टाफ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या सर्वांनी मिळून एक ॲक्शन प्लॅन तयार करायला सांगितले असून, त्या प्लॅननुसार बजेटमध्ये करावयाच्या तरतुदीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझ्या खात्याशी संबंधित सर्व मंजुरी प्रदान करत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
सिव्हिल हॉस्पिटलची दुरुस्ती करणे अतिशय गरजेचे आहे. दुरुस्ती खर्चिक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत होते; परंतु रत्नागिरी परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अतिशय महत्वाचे असल्याने रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात १० कोटी खर्च करून हॉस्पिटलची दुरुस्ती तातडीने होत असेल तर त्या दृष्टीने येथील सर्व संबंधित मंडळाशी चर्चा करून या गोष्टी तातडीने कशा काय पूर्ण करता येतील, याबाबत निर्णय घेण्यात जाईल.
-----------
चौकट
एसटी स्टँडची उभारणीही प्राधान्याने
रत्नागिरी येथे एसटी महामंडळाच्या स्टॅण्डचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या एसटी स्टँडच्या जागेला भेट दिली व त्याची पाहणी आज रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करू तसेच अशा अनेक गोष्टी आम्ही प्राधान्यक्रमाने करू, असे देखील चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90999 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..