महामार्गाचे जिल्ह्यात ९५ टक्के काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गाचे जिल्ह्यात ९५ टक्के काम
महामार्गाचे जिल्ह्यात ९५ टक्के काम

महामार्गाचे जिल्ह्यात ९५ टक्के काम

sakal_logo
By

45997
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण. सोबत राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत, रणजित देसाई, अतुल काळसेकर, संध्या तेरसे, दादा साईल आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

महामार्गाचे जिल्ह्यात ९५ टक्के काम

बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण ः कामे पूर्णत्वाची डेडलाईन २३ डिसेंबर २०२३

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः मुंबई-गोवा महामार्गाचे सिंधुदुर्गातील काम ९५ टक्के पूर्ण झाले असून पूर्णत्वाकडे जात आहे. तर रायगड-रत्नागिरीचे काम प्रगतीपथावर आहे. महामार्ग पूर्णत्वाची डेडलाईन २३ डिसेंबर २०२३ असेल. पनवेलपासून बांद्यापर्यंत हा महामार्ग पूर्ण करून तो खुला होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथील पत्रकार परिषदेत दिली. केंद्रात व राज्यात आमचे ‘टू टायर’चे गतिमान सरकार असल्यामुळे विकासकामेही तेवढ्याच गतीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बांधकाम मंत्री चव्हाण यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अॅड. अजित गोगटे, प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, रणजित देसाई, संध्या तेरसे, राजेंद्र म्हापसेकर, अशोक सावंत, दादा साईल, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम गांर्भीयाने घेतले आहे. अधिवेशनात लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे. महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून ते काम दुसऱ्या यंत्रणेमार्फत पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या. महसूल यंत्रणेला प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे सरकार गतिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे नेते आहेत. त्यांनी या महामार्गाला मंजुरी व निधी दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल, हे सर्वांनाच दाखवून दिले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम डेडलाईनच्या काळातच पूर्ण होईल.’’
महामार्गावर ५६ बेकायदेशीर मिडल कट असून यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याबाबतही पत्रकारांनी लक्ष वेधले असता महामार्गावरील वाहतूक सुकर व्हावी वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास कमी व्हावा, या दृष्टीने ज्या अडचणी आहेत व जी कामे अर्धवट आहेत, ती तातडीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री चव्हाण यांनी दिली. दरम्यान, राजन साळवी यांनी अनेक प्रश्नांसंदर्भात भेट घेतली. या दौऱ्यात अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही भेट घेतली. त्यामुळे साळवींचा भाजप प्रवेश शक्य आहे का, या प्रश्नाला बगल देत विकासकामांवर ही भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..............
‘नाणार’ पूर्ण होणार!
सोनवडे घाटरस्ता व नव्याने सुचविलेला आंजिवडे घाटरस्ता मार्गी लागण्यासाठी प्रयत्न आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुकर मार्ग म्हणून पर्यायी ठरणाऱ्या या दोन्ही घाटरस्त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील राहू. नाणार हा भाजपने आणलेला प्रकल्प असून तो पूर्ण होणारच, असे यावेळी मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91003 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..