मोटार अपघातात दोघे ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार अपघातात दोघे ठार
मोटार अपघातात दोघे ठार

मोटार अपघातात दोघे ठार

sakal_logo
By

46034
मळगाव ः नेमळे अपघातातील जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस येथे आग लागली.
46035 अपघाग्रस्त मोटार
46036 - संतोष परब
46037 - लोचन पालांडे
46038 - विशाल हाटले
46039 - दीपक आचरेकर
46040 - रुग्णवाहिका चालक गवस

मोटार अपघातात दोघे ठार
---
जखमींना नेणारी रुग्णवाहिकाही पेटली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः पुढील टायर फुटून मोटार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दोन जण जागीच ठार झाले. लोचन सुरेश पालांडे (वय ४५), संतोष भास्कर परब (४०) अशी त्यांची नावे आहेत. झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. या अपघातातील जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. धडक इतकी जोरात होती, की त्यानंतर मोटार रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शेतात जाऊन कोसळली. यात विशाल वसंत हाटले (४०) गंभीर जखमी झाले. दीपक गोविंद आचरेकर (३२) यांना किरकोळ दुखापत झाली.
गोठण (ता. मालवण) येथून बांदा येथे येत चौघांनी गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी केले. ते दुपारी परत निघाले. विशाल मोटार (एमएच ५० ए ३८३८) चालवत होते. मळगाव-नेमळेदरम्यान आले असता पुढील टायर फुटले. यामुळे गाडी नियंत्रणाबाहेर गेली. वेगाने ती रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. तेथून पुढे रस्त्याच्या पलीकडे तब्बल ३०० ते ४०० फूट जात शेतात जाऊन उलटली. पालांडे व परब रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोघेही जागीच ठार झाले.
घटनास्थळी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात होते. आजूबाजूला फटाके तसेच सजावटीचे सामान विखुरले होते. मोटारीचे तुटलेले भाग रस्त्यावर विखुरले होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेणारी १०८ रुग्णवाहिका मळगाव येथे आली असता तिने अचानक पेट घेतला. चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही कळले नाही. मात्र, नंतर रुग्णवाहिकेतून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने चालकाने रुग्णवाहिका थांबविली. चालक सावळाराम गवस आणि डॉ. अनघा बांद्रे यांनी प्रसंगावधान राखून रुग्णवाहिकेतील जखमींना बाहेर काढले. गवस यांनी जीवापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानून प्रसंगावधान दाखविले. गाडी पेट घेत असताना त्यांनी गाडीतील बाटलीत असलेल्या पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यांनी मदत मागण्याचाही प्रयत्न केला. शेवटी त्या तिघांनीच जखमींना गाडीबाहेर काढले. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात आले. हाटले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्या डोक्याला आणि छातीला तसेच संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.
अपघातस्थळी सावंतवाडी पोलिसांबरोबरच जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी दाखल झाले होते. लोचन पालांडे यांच्या मागे पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. संतोष परब यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर गोठणेतील उपसरपंच राजू लाड, तुषार लाड, परेश बाईत, घनश्याम चव्हाण आदींसह ग्रामस्थ सावंतवाडीत दाखल झाले होते.
........................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91060 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..