टु २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु २
टु २

टु २

sakal_logo
By

फोटो काल सोडला
rat२६p४.jpg
L45705
ः खेड ः सर्व विजेते खेळाडू आणि क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व अजित गालवणकर .
.......
टेबल टेनिसमध्ये रत्नागिरीच्या
आरव, अरूंधतीची बाजी
खेड, ता. २८ः महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट यांच्यातर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले-मुलींच्या वयोगटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटात रत्नागिरीतील आरव सरदेशमुख आणि अरूंधती फाळके यांनी बाजी मारली. यामध्ये ११ वर्षे वयोगटात मुलांमधून आरव सरदेशमुख, वेदस्वरूप सावंत व श्रेयस साळुंखे तर मुलींमधून श्रावणी माईन, तितीक्षा जाधव, नंदिनी बोरकर यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकावले तर १३ वर्षे वयोगटात आरव सरदेशमुख, वेदस्वरूप सावंत, सार्थक बैर आणि मुलींमधून अरूंधती फाळके, माही परिहार व श्रावणी माईन यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकावले. १५ वर्षे वयोगटात स्वयंभू निंबाळकर, आरव सरदेशमुख, वेदस्वरूप सावंत व मुलींमधून अरूंधती फाळके, श्रावणी माईन, आर्या वाटेकर यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकावले तसेच अटीतटीच्या झालेल्या १७ वर्षे वयोगटाच्या खेळात स्वयंभू निबांळकर, आर्यन कारेकर व संस्कार भोसले यांनी तर मुलींमध्ये अरूंधती फाळके, वैष्णवी माईन व समृद्धी मुळे यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकावले तसेच १९ वर्षे वयोगटात रवितेज मुळे, स्वयंभू निबांळकर, आरव सरदेशमुख आणि मुलींमधून अरूंधती फाळके, आयशा राठोड व श्रृती मलीक यांनी सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकावले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91083 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..