नागरिकांना अधिकारांची जाणीव हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांना अधिकारांची जाणीव हवी
नागरिकांना अधिकारांची जाणीव हवी

नागरिकांना अधिकारांची जाणीव हवी

sakal_logo
By

46068
कणकवली : कायदेविषयक मार्गदर्शन करताना न्यायाधीश टी. एच. शेख. शेजारी प्रा. डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, अॅड. मिलिंद सावंत आणि प्रा. मीनाक्षी सावंत. (छायाचित्र ः प्रथमेश जाधव)
----

नागरिकांना अधिकारांची जाणीव हवी

न्यायाधीश शेख ः कणकवलीत ‘कायदेविषयक साक्षरता’

कणकवली, ता. २८ : सर्व नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आवश्यक आहे. कोणत्याही घटकाने स्वतःवरती अन्याय सहन करू नये किंवा इतरांवर अन्याय करू नये. समाजामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचावा, यासाठी नागरिकांनी कायदेविषयक माहिती घेणे आवश्यक आहे, असे मत येथील दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांनी व्यक्त केले. कणकवली महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष आयोजित कायदेविषयक साक्षरता अभियानप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, अॅड. मिलिंद सावंत उपस्थित होते. अमली पदार्थ प्रतिबंध कायदा व रॅगिंग प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन करताना अॅड. सावंत यांनी विद्यार्थ्यांना अपराधाबद्दल न्यायपालिकेकडे कशी दाद मागू शकता व अपराध्यास कोणती शिक्षा होते, याबाबत माहिती दिली. याचप्रसंगी प्रा. चौगुले यांनी रॅगिंग व अमली पदार्थांच्या सेवनाने समाजावर विपरीत परिणाम होतो. व्यसनाधिनता व रॅगिंगमुळे शरीरासह मनालाही इजा पोहोचते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टींपासून दूर राहावे, असे आवाहन केले. प्रा. सुरेश पाटील, प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा. मनीषा सावंत, प्रा. विनया रासम, प्रा. सागर गावडे, प्रा. आदिती मालपेकर यांनी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाचे आयोजन केले. प्रा. मीनाक्षी सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनया रासम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91151 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..