खासदार राऊत आज सिंधुदुर्गात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार राऊत आज सिंधुदुर्गात
खासदार राऊत आज सिंधुदुर्गात

खासदार राऊत आज सिंधुदुर्गात

sakal_logo
By

swt२८६.jpg
46089
कर्ली ः एसटी चालक व वाहक यांचे स्वागत करताना प्रवासी.


कुडाळ-कर्ली एसटी
फेरी अखेर सुरू
कुडाळ, ता. २८ः भाजपचे येथील तालुकाध्यक्ष दादा साईल यांच्या पाठपुराव्यामुळे गेले दोन वर्ष बंद असलेली कुडाळ कर्ली एसटी पुन्हा सुरू झाली.
कोरोना कालावधीपासून कुडाळ आगारातून सुटणारी कुडाळ कोरजाई व्हाया कर्ली ही गाडी आगाराने बंद केली होती. याबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार वेंगुर्लेचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर यांनी निवेदनाद्वारे कुडाळ आगाराचे लक्ष वेधले होते. परंतु, नेहमीप्रमाणे त्यांना एसटी आगाराकडून धातूर मातूर उत्तरे मिळाली. त्यांनी ही गोष्ट येथील भाजपचे तालुकाध्यक्ष तथा पणदूर सरपंच साईल यांच्या कानावर घातली. श्री. साईल यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून कुडाळ आगारातून सुटणारी ही गाडी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर तात्काळ कालपासून (ता. २७) कुडाळ कोरजाई व्हाया कर्ली गाडी पूर्ववत सुरू झाली. श्री. साईल आणि प्रसाद पाटकर यांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
---------------
खासदार राऊत आज सिंधुदुर्गात
कुडाळ, ता. २८ ः शिवसेना गटनेते तथा खासदार विनायक राऊत हे उद्या (ता. २९) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असा ः सकाळी १०.३० वाजता कनेडी (ता.कणकवली) शिवसेना शाखा कार्यालय उद्घाटनास उपस्थिती, सकाळी ११.३० वाजता वामनाश्रम स्वामींची भेट (मुडे डोंगरी, हरकुळ, ता,कणकवली), दुपारी १२ वाजता कणकवली मधील जेष्ठ व्यापारी आप्पा सापळे यांच्या घरी सांत्वनपर भेट, दुपारी १.१५ वाजता कोलगाव (ता. सावंतवाडी) येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91170 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..