युवा महोत्सवात देव महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा महोत्सवात देव महाविद्यालयाचे यश
युवा महोत्सवात देव महाविद्यालयाचे यश

युवा महोत्सवात देव महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

rat28p3.jpg-
46108
दादर : सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टचा डॉ. पराडकर पुरस्कार स्वरूप काणे याला देताना मेधा कुलकर्णी. सोबत मंजुषा कुलकर्णी, डॉ. गौरी माहुलीकर.
-------------
स्वरूप आणि प्रियांकाला संस्कृतचा
डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार प्राप्त
रत्नागिरी : दरवर्षी पदवीस्तरावर संस्कृत विषयात सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दादरमधील सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या वतीने डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार दिला जातो. यावर्षी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या दोघांना हा पुरस्कार प्राप्त झाला. संस्कृत विभागातील पदव्युत्तर द्वितीय वर्षात संस्कृत विषयाला असणारे प्रियांका ढोकरे आणि स्वरूप काणे यांनी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी आकाशवाणीच्या निवेदिका मेधा कुलकर्णी, राजपत्रित अधिकारी मंजूषा कुलकर्णी आणि चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शैक्षणिक संचालक डॉ. गौरी माहुलीकर यांच्या हस्ते दि. पराडकर पुरस्कार देण्यात आला. प्रियांका ढोकरे हिने पदवीला संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठात पदवीला प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर स्वरूप काणे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, सहाय्यक प्राध्यापक जयंत अभ्यंकर आणि स्नेहा शिवलकर यांनीही याबद्दल दोन्ही विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
-------------
युवा महोत्सवात देव महाविद्यालयाचे यश
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या 55 व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. यात देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात 14 कलाप्रकारात सहभाग घेतला. मराठी कथाकथनमध्ये तृतीय वर्ष कला शाखेच्या वैष्णवी बाणे हिने शहिद जवान ऋषीकेश जोंधळे (कोल्हापूर) ही कथा सादर करुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मेहंदीमध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या सायली फणसेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी या दोन्ही विद्यार्थिनींची निवड झाली आहे. विद्यार्थ्याना सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर, वैभव घाणेकर, हरेश केळकर यांनी मार्गदर्शन केले. सेजल मयेकर, श्रद्धा आंब्रे, ऋतुजा बेकवाडकर, समीक्षा बिर्जे, अरशीन सय्यद, सिद्धी किल्लेकर, बागेश्वरी रेड्डी, यशराज चाळके, सेजल मडके, निधी डोंगरे, मयुरेश आगरे, निरंकर देवकड, सिद्धेश भातडे विविध कलाप्रकारात सहभागी झाले होते. मॅनेजमेंट टीममध्ये साक्षी जाधव, अंकिता कुंभार, धनश्री साळवी, आकांशा वेतोसकर सहभागी होते. युवा महोत्सवासाठी विद्यार्थ्यासमवेत सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर, वैभव घाणेकर, हरेश केळकर, मिथिला वाडेकर उपस्थित होते.
----------------
भालावली महाविद्यालयात
मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन सोहळा
रत्नागिरी : भालावली (ता. राजापूर) येथील युवक विकास मंडळ संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ व वाचक गटाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी यांनी भूषविले. मराठी वाङ्मय मंडळ व वाचक गटातील सदस्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर चारोळी, सुविचार, कविता, बोधकथा, व्यंगचित्रे, विनोद आदी कलासाहित्याने युक्त अशा साहित्यात दंग सप्तरंग या भित्तीपत्रकाचे अनावरण प्रा. नामजोशी यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. रचना सावंत यांनी मराठी वाङ्मय मंडळ व वाचक गट स्थापनेमागील उद्देश व या विभागामार्फत वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रा. नामजोशी यांनी मराठी भाषेमध्ये अमृताला जिंकण्याचे सामर्थ्य आहे. अशा मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी युवकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील सम्यक जाधव याने केले. प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थींनी सिद्धिका लाड हिने आभार मानले.
-------------
rat28p6.jpg-
46111
मुंबई विद्यापीठाच्या प्राथमिक फेरीत यश मिळवणारे एस. बी. कीर लॉ कॉलेजचे विद्यार्थी. सोबत प्र. प्राचार्या सौ. तृप्ती देवरुखकर आणि प्राध्यापक.
----------

कीर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या 55 व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत येथील श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 26 कलाप्रकारात सहभाग घेतला. त्यातून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड झाली. यामध्ये नाट्यसंगीत प्रथम वैष्णवी जोशी, शास्त्रीय संगीत, प्रथम वैष्णवी जोशी, भारतीय शास्त्रीय स्वरवाद्य तृतीय स्वराली देसाई, कथाकथन (मराठी) प्रथम श्रेया कुलकर्णी, कथाकथन (हिंदी) उत्तेजनार्थ : गीता राठोड, वक्तृत्व (मराठी) द्वितीय श्रेया कुलकर्णी, वादविवाद स्पर्धा सांघिक तृतीय श्रेया कुलकर्णी, शुभम सरदेसाई, एकपात्री - मुकाभिनय (हिंदी) प्रथम देवयानी राजेशिर्के, एकपात्री मुकाभिनय (मराठी) द्वितीय अंकीता साजणीकर, स्कीट (मराठी) सांघिक तृतीय सहभाग - देवयानी राजेशिर्के, अंकीता साजणीकर, अनुष्का राणे, आकांक्षा मोरे, सई कान्हेरे, स्वराली देसाई यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना स्पर्धा विभाग प्रमुख प्रा. सौ. संयोगिता सासने, प्रा. आशिष बर्वे, प्रा. सौ. गौरी देसाई, नंदू जुवेकर आणि त्यांचे सहकारी, विद्यार्थी प्रतिनिधी आर्य आंबुलकर, पूर्वा पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातर्फे त्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी प्र. प्राचार्या सौ. तृप्ती देवरुखकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91198 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..