चिपळूण ः महाराष्ट्र स्टार्टप व इनोव्हेशन यात्रेचे चिपळुणात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः महाराष्ट्र स्टार्टप व इनोव्हेशन यात्रेचे चिपळुणात स्वागत
चिपळूण ः महाराष्ट्र स्टार्टप व इनोव्हेशन यात्रेचे चिपळुणात स्वागत

चिपळूण ः महाराष्ट्र स्टार्टप व इनोव्हेशन यात्रेचे चिपळुणात स्वागत

sakal_logo
By

-rat२८p८.jpg
46118
- चिपळूण ः विविध शासकीय योजनांची माहिती देताना अधिकारी.
--------------
महाराष्ट्र स्टार्टप व इनोव्हेशन यात्रेचे चिपळुणात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः तरुणांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेस सुरवात झाली. राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते नवनवीन संकल्पना विकसित करीत आहेत. राज्याच्या तळागाळातून अशा नावीन्यपूर्ण संकल्पनांचा व नवउद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप यात्रा उपक्रमाचे आयोजन केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे, शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सभागृह येथे या यात्रेचे आगमन झाले.
या वेळी इनुजा शेख (सहाय्यक आयुक्त, स्किल्स डेवलपमेंट), गणेश बीटोडे (स्किल्स डेवलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट ऑफिसर), सोनम पवार (डिस्ट्रिक्ट कॉ - ऑर्डिनेटर, अण्णासाहेब पाटील महामंडळ), सिद्धेश पुंडेकर, (महात्मा गांधी नॅशनल फेलो. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट) आदी उपस्थित होते. संचालक शांताराम खानविलकर स्वागत केले. इनुजा शेख यांनी स्टार्टअपबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश बीटोडे यांनी विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना स्पर्धेच्या रुपात समोर येण्यासाठी या संदर्भातील प्रकिया आणि येणाऱ्या काळात उद्योजकता विकास, कौशल्य विकासासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली. सोनम पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व त्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. गणेश मुंडे यांनी स्टार्ट अप मोबाइल व्हॅन (व्हेहीकल) चित्रफितीद्वारे या योजनेची माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील अर्ज आणि प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
..
चौकट
नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव
विद्यार्थ्यांच्या विविध नवीनतम कल्पना समजून घेऊन या कल्पना स्टार्ट अप योजनेत समाविष्ट करण्यात येऊ शकतात. यातून तरुण उद्योजकांना चालना मिळून उद्योजकता विकास घडून येऊ शकतो. विद्यार्थ्यांना या संदर्भात विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तीन टप्प्यांत हा उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव या संकल्पनेद्वारे मिळणार आहे. यावर आधारित नवीनतम कल्पना सादरीकरणाची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91200 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..