रत्नागिरी- मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ
रत्नागिरी- मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ

रत्नागिरी- मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ

sakal_logo
By

rat२८p७.jpg-
46112
रत्नागिरी : प्र. ल. लघुपटाची डिव्हीडी आणि एकांकिकांचे पुस्तक प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांना देताना श्रीकांत पाटील. सोबत डॉ. मकरंद साखळकर, दुर्गेश आखाडे, डॉ. नितीन चव्हाण.
--------------
प्र. ल. लघुपटातून अनुभवला
मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ
रत्नागिरी, ता. २८ : जीजेसी फिल्म क्लब आणि समर्थ रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ज्येष्ठ नाटककार (कै.) प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारीत प्र. ल. हा लघुपट दाखवण्यात आला. यातून विद्यार्थ्यांनी मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ अनुभवताना प्र.ल. मयेकरांचा इतिहास जाणून घेतला.
या वेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, समर्थ रंगभूमीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, कोमसाप रत्नागिरी शाखेचे युवक अध्यक्ष दुर्गेश आखाडे, रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण, जीजेसी फिल्म क्लबच्या समन्वयक प्रा. डॉ. निधी पटवर्धन उपस्थित होत्या. समर्थ रंगभूमीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी समर्थ रंगभूमी आणि प्र.ल. मयेकर यांचे नाते सांगताना प्र.ल.मयेकर यांनी समर्थ रंगभूमीसाठी कुंतीपार्थिव हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिले. प्राथमिक फेरीत हे नाटक पहिले आले. अंतिमला मात्र यशाने हुलकावणी दिली. समर्थ रंगभूमीने प्र.ल. मयेकरांच्या ५ एकांकिकांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचबरोबर लघुपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा एक ठेवा आम्ही जपून ठेवला आहे असे पाटील म्हणाले. आखाडे यांनी प्र.ल.लघुपट निर्मिती कशी झाली याची माहिती देताना हा लघुपट सह्याद्री वाहिनीवर तीनवेळा प्रसारीत झाल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी जीजेसी फिल्म क्लबबाबत माहिती दिली. समर्थ रंगभूमीच्या माध्यमातून प्र. ल.सारखा चांगला लघुपट पहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मनस्वी नाटेकर हिने केले. दर्शना काळेने आभार मानले. या वेळी आदित्य भट याने काढलेली आकर्षक छायाचित्रे दाखवण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91201 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..