पावस-मावळंगे, पूर्णगड, गावडेआंबेरेत निवडणुकीची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-मावळंगे, पूर्णगड, गावडेआंबेरेत निवडणुकीची मोर्चेबांधणी
पावस-मावळंगे, पूर्णगड, गावडेआंबेरेत निवडणुकीची मोर्चेबांधणी

पावस-मावळंगे, पूर्णगड, गावडेआंबेरेत निवडणुकीची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

ग्रामपंचायत निवडणूक
- लोगो
........

मावळंगे, पूर्णगड, गावडेआंबेरेत मोर्चेबांधणी
---
पावस गट; थेट सरपंचपदामुळे चुरस वाढणार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २८ ः जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे या खेपेस थेट सरपंच निवड ग्रामपंचायत सदस्यांबरोबर होणार असल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
या जिल्हा परिषद गटातील मावळंगे, पूर्णगड व गावडे आंबेरे या ग्रामपंचायतीची मुदत काही दिवसांत महिन्यात संपणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच या ग्रामपंचायतीत थेट सरपंच निवड झाली होती. त्यामुळे इच्छुकांची संख्या आपोआप कमी झाली होती. कारण ज्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार, त्याप्रमाणे जनतेतूनच सरपंच निवड झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा बाजारभाव व आर्थिक उलाढाल आपोआप कमी झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीत सलग पाच वर्षे सरपंचपद मिरविणे व सलग गाव विकासाच्या दृष्टीने काम करण्यास मदत झाली होती. यात प्रामुख्याने कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला आपली ताकद दाखवून नामोहरम करण्याचा प्रश्न आलेला नाही. कारण, अन्य ग्रामपंचायतीत सदस्यांमधून सरपंच निवड असल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा भाव वाढलेला होता. कारण, ग्रामपंचायतीत पाच वर्षांत दोन किंवा तीन सरपंच होणे आपोआप ठरले जात होते. त्यामुळे कोणत्याही सरपंचाला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळेपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा लागत होता. यात मात्र सरपंचपद मिळाले एवढेच समाधान मिळत होते. प्रशासकीय कामाचा अनुभव मिळणे कठीण झाले आहे. राज्यांमध्ये सरकार पुन्हा बदलल्याने थेट सरपंच निवडीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याने काही ग्रामपंचायतीत नाराजीचा सूर निघत आहे, तर काही ग्रामपंचायतीत स्वागत केले जात आहे.
--------
चौकट
थेट सरपंच निवडीचा कामकाजासाठी फायदा
या संदर्भात ग्रामस्थ अनिल बिर्जे म्हणाले, की दरवर्षी सरपंच बदलल्याने त्याला फक्त सरपंचपदाचा मान मिळतो. मात्र, प्रशासकीय कामाची माहिती मिळणे कठीण बनते. त्याशिवाय, दोन सरपंचांच्या अंतरात उपसरपंचाला कामकाज पाहावे लागते. यात काही प्रमाणात शासनाचा पैसा खर्च होतो. थेट सरपंच निवडीमुळे प्रत्येक मतदार आपल्याला हवा असलेला उमेदवार सरपंच म्हणून निवडून देतो व त्याला पाच वर्षे प्रशासकीय कामकाज करण्याची व माहिती करून घेण्याची संधी मिळते.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91225 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..