डीबीजेत कोकणातील पहिला इंग्रजी भाषा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीबीजेत कोकणातील पहिला इंग्रजी भाषा महोत्सव
डीबीजेत कोकणातील पहिला इंग्रजी भाषा महोत्सव

डीबीजेत कोकणातील पहिला इंग्रजी भाषा महोत्सव

sakal_logo
By

डीबीजे महाविद्यालयात
‘भाषा महोत्सव’ साजरा
चिपळूण, ता. २८ : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातत ‘भाषा महोत्सव’ साजरा करण्यात आला. या महोत्सवाला विद्यार्थ्यांनीं भरघोस प्रतिसाद दिला. त्यामध्ये सती न्यू इंग्लिश स्कूल, काळसेकर कॉलेज, दलवाई कनिष्ठ कॉलेज, एस. पी. एम.कॉलेज व नॅशनल इंग्लिश मीडियम अशा एकूण ५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एकूण ११६ विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमात मुलांसाठी स्पेल बी, एक्स्टेंपो, काव्यवाचन, क्विज, स्टोरी रायटींग अशा स्पर्धा घेण्यात आल्या. याव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांसाठी एक्झिबिशन आणि गेम्स हे विशेष आकर्षण ठरले. जगभरात नावाजलेल्या अभिजात साहित्यातील काही प्रमुख पुस्तके व लेखकांची माहिती, भारतीय आणि ग्रीक नाट्य परंपरेची माहिती, काही प्रमुख जागतिक सफरींचे मार्ग यात दाखविण्यात आले. यासह मेमरी गेम्स, फिशिंग द वर्ड्ससारख्या खेळांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या ग्रिटींग्ज आणि बुकमार्क विक्रीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. डीबीजेच्या इंग्रजी विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण महोत्सवाचे परीक्षण प्रा. गौतम ब्रह्मे, सौ. सोनाली वराडे, वारंग, मुग्धा पाध्ये यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91282 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..