राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा
राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा

राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा

sakal_logo
By

धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी व्हावी
आमदार राजन साळवी यांचा पुनरूच्चार; शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ : तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही सर्व शिवसेनेची मंडळी स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले असून स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असल्यामुळे राजापूरच नव्हे तर, रत्नागिरी जिल्ह्याचा विकासाचा कायापालट करणारा प्रकल्प व्हावा अशी आमदार म्हणून आपलीही सकारात्मक भूमिका असल्याचा पुनरूच्चार आमदार राजन साळवी यांनी केला आहे.
तालुक्यातील बारसू-गोवळ परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या सरकारनेही रिफायनरी उभारण्याचे सूतोवाच केले आहे. एका बाजूला शासनाकडून रिफायनरी उभारण्याच्या सकारात्मक हालचाली सुरू असताना अनेक ग्रामपंचायतींसह राजापूर नगरपालिकेने रिफायनरी उभारण्याला हिरवा कंदील दाखविला आहे. तर, अनेक सामाजिक संस्थांसह व्यापारी संघटनांनी रिफायनरीच्या उभारणीचे समर्थन केले आहे. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी प्रकल्प विरोधातीलही भूमिका घेतली आहे. या साऱ्या घडामोडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार असताना आमदार साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यातील सरकार बदलल्याने आमदार साळवी यांची नेमकी भूमिका काय असणार याची साऱ्यांना उत्सुकता होती. मात्र, त्यांनी रिफायनरी उभारणीचे समर्थन करताना आपण आपल्या पूर्वीच्या प्रकल्प समर्थनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचा उच्चार केला आहे.
स्थानिकांना प्रकल्प हवा असल्यामुळे आणि विकासात्मक कायापालट होणार असल्याने रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी आपली भूमिका असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
चौकट
आमदार राजन साळवी यांची भूमिका
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी संबंधी काही दिवसांपूर्वी बोलताना स्थानिक आमदारांचा सततचा संपर्क स्थानिक जनतेशी येत असतो. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी घेतलेली भूमिका ही स्थानिक जनतेची असणार. लवकरच आमदार साळवी यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91283 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..