नळपाणी योजनेतील संमतीपत्राचे अडथळे दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळपाणी योजनेतील संमतीपत्राचे अडथळे दूर
नळपाणी योजनेतील संमतीपत्राचे अडथळे दूर

नळपाणी योजनेतील संमतीपत्राचे अडथळे दूर

sakal_logo
By

टु १
...
नळपाणी चित्र वापरा
..
राजापुरातील नळपाणी योजनाः लोगो
.............
संमतीपत्राचा प्रश्‍न निकाली

गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार; दहाहून अधिक गावांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ : ‘हर घर में नळ’ देणाऱ्‍या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, अनेक गावांमध्ये जमीन मालकांच्या संमतीपत्राअभावी नळपाणी योजनांचे प्रस्तावपूर्ती आणि प्रत्यक्ष अंमलबाजावणी करण्यामध्ये अडथळे येत होते. गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी त्यासाठी पुढाकार घेत संबंधितांशी कधी स्वतः, तर कधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यातून दहाहून अधिक गावांमधील जमीनमालकांच्या संमतीपत्राचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.
जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे गावोगावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातूम सर्वेक्षण करण्यात आले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्याचा संभाव्य जलजीवन मिशन योजनेचा कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार केला. नळपाणी योजना राबवीत असताना पाण्याची साठवण टाकी ज्या जागेमध्ये उभारायची आहे, त्या जागामालकाचे संमतीपत्र असणे गरजेचे असते. अनेक गावांमधील जागामालकांची संमतीपत्र नसल्याने या नळपाणी योजनांचे परिपूर्ण प्रस्तावपूर्तीत अडथळे येत होते. गटविकास अधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंडित यांनी संबंधित जागामालकांची संमतीपत्र मिळविण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेत प्रयत्न सुरू केले.
------------------------
चौकट ः
या योजनांच्या संमतीपत्रांचा प्रश्‍न मार्गी
पेंडखळे, नाटे यशवंतगड, नाणार पाळेकरवाडी, पेंडखळे चिपटेवाडी, जुवे जैतापूर, ओशिवळे, कुवेशी तुळसुंदेवाडी, रायपाटण, तेरवण, कार्शिंगेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91284 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..