चिपळूण ः शिवसेनेच्या नांदाला लागल तर भस्मसात व्हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः शिवसेनेच्या नांदाला लागल तर भस्मसात व्हाल
चिपळूण ः शिवसेनेच्या नांदाला लागल तर भस्मसात व्हाल

चिपळूण ः शिवसेनेच्या नांदाला लागल तर भस्मसात व्हाल

sakal_logo
By

दसरा मेळावा रोखण्याचा प्रयत्न नको

आमदार भास्कर जाधवांचा शिंदे गटाला इशारा, सेनेच्या नादाला लागल तर भस्मसात व्हाल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 28 ः शिवसेनेच्या नादाला लागाल तर भस्मसात व्हाल. शिवसेना हा जुना पक्ष असून तो हिंदुत्वाचा अंगार आहे, शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा राजकीय कारकीर्द भस्मसात होईल. दसरा मेळावा हा इतिहास, परंपरा आहे. ती कोणीही रोखण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला दिला. शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
नेहमीप्रमाणे त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. पक्षातील फुटीनंतर अडचणीत सापडलेल्या शिवसेनेने आता उभारी घेण्यासाठी नवे मार्ग आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याची घोषणा नुकतीच शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आली. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती करताच भाजपने टीका करत खिल्ली उडवली. ही युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, असे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, भाजपने आजवर दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम, रासपचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांच्यासोबत युती केली. मात्र, आज या सगळ्यांची अवस्था काय झाली, हे आपण बघताय. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो मैत्री करतो व त्याला जागतो. संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले असते. मात्र, यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला झालेल्या शिंदे गटाने हा मेळावा हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगत आहे.
-------------------------
चौकट
चाकरमान्यांशी संपर्क
आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आज ते चिपळुणातील मुंबई - गोवा महामार्गालगत असलेल्या संपर्क कार्यालयात नागरिकांना भेटत होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील चाकरमानी गावी येत आहेत. गावी जाण्यापूर्वी अनेक चाकरमान्यांनी आमदार जाधव यांची संपर्क कार्यालयात भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91290 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..